“साडे 3 जिल्ह्याच्या पक्षाचे नेते पंतप्रधानांवर बोलतायेत, शरद पवारांनी आपली कारकीर्द तपासावी”

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पत्रकार परिषद घेत विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही शरद पवारांनी थेट निशाणा साधला. त्यानंतर भाजपकडूनही उत्तर देण्यात आलं.

चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्विट करत शरद पवार (Sharad Pawar) यांच्या टीकेला उत्तर दिलं आहे. त्यांनी साडेतीन जिल्ह्यांचा पक्ष असं म्हणत राष्ट्रवादीवर टीकास्त्र डागलंय.

ज्या शरद पवार यांना आपल्या पक्षाचा राष्ट्रीय दर्जा टिकवता आला नाही ते पवार साहेब आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करत आहेत. पवार साहेब तुम्ही राजकारण करताना कायम साडेतीन जिल्ह्यांचाच विचार केला आणि आज भाजप देशभरात कुठल्या राज्यात आहे आणि कुठल्या राज्यात नाही हे गणित सांगत सुटला आहात, असं म्हणत त्यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर पलटवार केला आहे.

मोदीजी पुन्हा येणार नाहीत असं भाकीत तुम्ही केलं पण तुमचं हे भाकीत खरं होणार नाही. कारण जनता मोदीजींच्या पाठीशी कालही होती आणि आजही आहे. समाजात द्वेष निर्माण करण्याचं काम कुणी केलं हे महाराष्ट्रातील जनतेनं तुमचं सरकार असताना पाहिलंय. त्यामुळे मोदीजींकडे बोट दाखवण्यापूर्वी एकदा आपली कारकीर्द तपासून बघा, असं बावनकुळे म्हणालेत.

महत्त्वाच्या बातम्या-