बीडमध्ये धनंजय मुंडे यांना मोठा धक्का!
बीड | राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) हे आज मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांची बीड येथे जाहीर सभा होत आहे. कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या बालेकिल्ल्यातच शरद पवार यांची सभा होत असल्याने या सभेकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
सभेआधीच धनंजय मुंडे यांना मोठा धक्का बसला आहे. परळी येथील धनंजय मुंडे यांचे खंद समर्थक बबन गित्ते हे राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. बबन गित्ते मुंडे यांचे अत्यंत विश्वासू सहकारी आहेत.
बबन गित्ते हे धनंजय मुंडे यांच्यासमोरचा नवा पर्याय असल्याचंही सांगितलं जात आहे. त्यामुळे आगामी काळात धनंजय मुंडे यांनी डोकेदुखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
शरद पवार हे औरंगाबादहून थेट बीडला येणार आहेत. बीडला आल्यावर ते जाहीर सभेच्या ठिकाणी थेट जाणार नाहीत. पवार आधी बीडमध्ये शक्तीप्रदर्शन करणार आहेत. बीडच्या महालक्ष्मी चौकातून पवार यांची रॅली निघणार आहे. या रॅलीच्या माध्यमातून ते शक्तीप्रदर्शन करणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
Comments are closed.