“2024 ला आयेगा तो मोदी नाही तर जायेगा तो मोदी ही…”

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (Narendra Modi) पुन्हा एकदा निशाणा साधलाय. आयेगा तो मोदी नही, जाऐगा तो मोदीही, अशी नवी घोषणाही राऊतांनी दिली आहे. देशातलं वातावरण बदलत आहे. 2024 ला आयेगा तो मोदी नाह, तर जायेगा तो मोदीच्याच घोषणा असतील, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

गोधरा हत्याकांडाप्रमाणे राम मंदिराच्या उद्घाटनाला देशभरातून ट्रेन बोलवतील आणि त्या एखाद्या ट्रेनवर हल्ला करतील. त्याच्या आगीचा डोंब उसळणार तर नाही ना अशी भीती वाटतेय. पुलवामा सारखा प्रकार घडेल असं देशातील प्रमुख विरोधी पक्षाला वाटत आहे, असं संजय राऊत म्हणालेत. जनतेच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करून धार्मिक तणाव निर्माण करायचा आणि मग निवडणुकीला सामोरे जायचं. हा एकच अजेंडा सध्या भाजपकडे आहे, अशी टीका संजय राऊतांनी केली आहे.

इंडिया आघाडीला कोणीही काउंटर करू शकत नाही. आम्हाला कोणीही रोखू शकत नाही. कुणीही काहीही करू येत्या निवडणुकीत इंडियाच जिंकेल, असा विश्वास संजय राऊतांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, देशातील 27 पक्षांच्या ‘इंडिया’ आघाडीची बैठक 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर रोजी मुंबईत होत आहे. याच पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बैठकीतील महत्वाचे मुद्दे, इंडियाचं जागावाटप यावर संजय राऊतांनी भाष्य केलं.

पुलवामा हल्ला झाला नव्हता तर केला होता, असा दावा जम्मू काश्मिरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी केला होता. गोध्राबाबतही असेच दावे केले गेले होते. त्यामुळे 2024 ची लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी लोकांच्या मनात भीती निर्माण करण्याकरता राम मंदिराच्या उद्घाटनावेळी देशभरातील लोकांना बोलावून विशिष्ट भागात ट्रेनवर दगडफेक केली जाईल, अशी भीती आम्हा सर्व विरोधी पक्षांच्या लोकांच्या मनात आहे. आम्ही या सर्व स्थितीवर लक्ष ठेवून आहोत. तसेच उद्याच्या होणाऱ्या बैठकीत या विषयावर आमच्यात चर्चा होईल, असं संजय राऊत म्हणालेत.

महत्त्वाच्या बातम्या-