INDIA आघाडीत पंतप्रधानपदासाठी रस्सीखेच, शरद पवारांचं नाव कितव्या नंबरला?

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

2024 ला होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. भारतीय जनता पक्षाने पुन्हा एकदा नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या चेहऱ्यावरच निवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहेत, तर विरोधी पक्षांनी भाजपविरोधात एकजूट केली आहे. बंगळुरु येथे पार पडलेल्या विरोधकांच्या बैठकीत या आघाडीला त्यांनी INDIA असं नाव दिलं. तेव्हापासून विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतल्याचं पहायला मिळत आहे. दुसरीकडे काही प्रादेशिक पक्षांनी मात्र अद्याप आपली भूमिका जाहीर केलली नाही. त्यामुळे ते वेळ पाहून निर्णय घेतील का स्वतंत्र निवडणूक लढवणं पसंत करतील हे येत्या काळात कळेल.

भाजपची भूमिका स्पष्ट आहे. आपल्यासह असलेल्या पक्षांची त्यांनी पुन्हा युती जाहीर केली आहे. या युतीला NDA असं नाव आहे. एनडीएचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदीच असतील यावर जवळजवळ शिक्कामोर्तब झाल्यात जमा आहे. दुसरीकडे INDIA आघाडीने भाजप तसेच मोदींविरोधात जोरदार आघाडी उघडली आहे, मात्र या आघाडीपुढे सर्वात मोठं आव्हान आहे ते पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर करण्याचं.

एनडीए तसेच भाजपचा पंतप्रधानपदाचा उमेदवार नक्की असल्याने त्यांना प्रचार करणं सोपं जाईल. मोदींच्या नावावर पुन्हा एकदा मतं मागितली जातील. INDIA आघाडीकडे मात्र पंतप्रधानपदासाठी एक असा चेहरा नाही. अनेक पक्ष एक आल्याने आणि ज्या त्या राज्यांमध्ये या पक्षांची चांगली ताकद असल्याने अनेकांचे डोळे पंतप्रधानपदाच्या खुर्चीकडे लागले आहे. काँग्रेसची सध्याची अवस्था फारच बिकट असल्याने प्रादेशिक पक्षांकडे पंतप्रधानपदासाठी आपला उमेदवार पुढे रेटण्याची एक नामी संधी आहे. ती प्रादेशिक पक्षांची चांगली हेरली असून यादृष्टीने जोरदार रस्सीखेच सुरु झाल्याचं दिसतंय.

INDIA आघाडी कडून पंतप्रधानपदाचे दावेदार कोण?

राहुल गांधी: काँग्रेस हा INDIA आघाडीतला प्रमुख पक्ष आहे. काँग्रेसने पंतप्रधानपदावर दावा सागितला नसला तरी त्यांच्याकडून अप्रत्यक्षपणे राहुल गांधी यांना पंतप्रधानपदाचा चेहरा म्हणून पुढं केलं जात आहे.


नितीश कुमार: जेडीय हा INDIA आघाडीतला आणखी एक महत्त्वाचा पक्ष… भाजपसोबत असलेली युती तोडण्याचा धाडसी निर्णय नितीश कुमार यांनी घेतला आणि त्यांनी मोदींची साथ सोडली. त्यांची पंतप्रधानपदाची महत्त्वाकांक्षा लपून राहिलेली नाही. काँग्रेसने पंतप्रधानदावर दावा केला नाही तर नितीश कुमार प्रमुख दावेदार असतील.


ममता बॅनर्जी: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सर्वात महत्त्वाकांक्षी राजकारणी म्हणून ओळखल्या जातात. त्या आपल्या रोखठोक स्वभावासाठी सुद्धा प्रसिद्ध आहे, त्यांचा सुद्धा पंतप्रधानपदावर दावा आहे.

अरविंद केजरीवाल: काँग्रेस देशात सत्तेवर असताना भ्रष्टाचाराविरोधी आंदोलन उभारणारे आणि नंतर आम आदमी पक्षाच्या माध्यमातून दिल्ली तसेच पंजाबमध्ये सत्ता खेचून आणणारे अरविंद केजरीवाल सुद्धा पंतप्रधानपदाच्या शर्यतीत आहेत. वरील नावांशिवाय काही प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांची पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून इच्छा आहे. यामध्ये समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव यांचा समावेश आहे.

शरद पवार पंतप्रधानपदावर दावा सांगणार का?

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार कायमच पंतप्रधानपदासाठी उत्सुक राहिले आहेत, मात्र त्यांना ती संधी अद्याप मिळालेली नाही. INDIA आघाडीतील महाराष्ट्रातील प्रमुख पक्षांमध्ये राष्ट्रवादीचं नाव आहे, मात्र नुकतीच राष्ट्रवादीत मोठी फूट पहायला मिळाली. अजित पवार आपला गट घेऊन भाजपला जाऊन मिळाले. त्यामुळे आधीच कमी असलेली शरद पवार यांची लोकसभा निवडणुकीसाठीची ताकद आणखी कमी झाली आहे. आपल्याला पंतप्रधानपदात रस नसल्याचे त्यांनी याआधी जाहीर केले आहे, मात्र वेळ पडली तर एक सर्वमान्य नाव म्हणून त्यांच्या नावाचा विचार होऊ शकतो.

महत्त्वाच्या बातम्या-