Apple ने iPhone 13, 14 च्या किंमती केल्या कमी

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | Apple नं iPhone 15 सीरिज 12 सप्टेंबरला लाँच केली. या सीरिज अंतर्गत iPhone 15, iPhone 15 Plus, iPhone 15 Pro आणि iPhone 15 Pro Max असे चार मॉडेल्स लाँच करण्यात आले आहेत. नवीन आयफोन लाँच केल्यानंतर Apple ने मोठा निर्णय घेतलाय.

नवीन आयफोन लाँच केल्यानंतर लगेचच टेक जायंट अ‍ॅप्पलनं गेल्यावर्षी आलेल्या iPhone 14 आणि iPhone 14 Plus स्मार्टफोन्सच्या किंमतीत कायमस्वरूपी कपात केली आहे.

नवीन आयफोन लाँच झाल्यानंतर जुन्याच्या किंमती कमी होणं ही नवीन गोष्ट नाही. आयफोन-15 च्या घोषणेनंतरच iPhone 13 च्या किंमतीमध्ये घट दिसून येत होती. आता iPhone 15 लाँच झाल्यामुळे iPhone 14 च्या किंमतीत तब्बल 13 हजारांपर्यंतची घट झाल्याचं दिसून येत आहे. विशेष म्हणजे कोणत्याही बँक ऑफरशिवाय असणारा हा फ्लॅट डिस्काउंट मिळणार असल्याची माहिती आहे.

गेल्या वर्षी आयफोन-14 भारतात लाँच झाला होता. यावेळी त्याची किंमत ही 79,900 रुपये एवढी होती. ही किंमत 128GB बेस व्हेरियंटची होती. आता फ्लिपकार्टवर हा फोन चक्क 66,999 रुपयांना मिळत आहे. म्हणजेच, ओरिजिनल किंमतीपेक्षा तब्बल 12,991 रुपयांची सूट यावर मिळत आहेत. यामुळे जे आयफोन 15 घेऊ शकत नाही त्यांना आयफोन 13, 14 घेता येऊ शकेल.

या शिवाय अ‍ॅपलच्या वेबसाईटवरुन खरेदी करणाऱ्या ग्राहकांना इंन्सटंट कॅशबॅक मिळणार आहे. 8 हजारांपर्यंत हा कॅशबॅक एचडीएफसीच्या क्रेडीट कार्डवर दिला जणार आहे. म्हणजे ही सूट एकूण 18000 रुपयांची होईल.

महत्त्वाच्या बातम्या-