iphone 15 बद्दल ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितीये का?

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
.

मुंबई | अखेर प्रतीक्षा संपली. Apple ने iPhone 15 मालिका स्मार्टफोन लॉन्च केला आहे. या सीरीज अंतर्गत iPhone 15 चे चार मॉडेल लॉन्च करण्यात आलेत. या मालिकेत iPhone 15, iPhone 15 Plus, iPhone 15 Pro आणि iPhone 15 Pro Max यांचा समावेश आहे.

iphone 15 ची किंमत किती?

किंमतीबद्दल बोलायचं झाल्यास Apple ने iPhone 15 चा 128GB प्रकार $799 मध्ये आणि iPhone 15 Plus चा 128GB प्रकार $899 मध्ये लॉन्च केला आहे. भारतीय रुपयांमध्ये, हे 66,195 आणि 74,480 रुपयांना लॉन्च केलं गेलं. iPhone 15 आणि 15 Plus च्या प्री-ऑर्डर 15 सप्टेंबरपासून सुरू होतील तर त्यांची विक्री 22 सप्टेंबरपासून सुरू होईल. भारतात तुम्ही ते Apple च्या अधिकृत वेबसाइट, Amazon आणि Apple Store वरून खरेदी करू शकाल.

iphone 15 मध्ये वेगळं काय?

iPhone 15 मध्ये 6.1 इंचाचा डिस्प्ले आहे तर कंपनीने iPhone 15 Plus मध्ये 6.7 इंचाचा डिस्प्ले दिला आहे. iPhone 15 Pro आणि iPhone 15 Pro Max मध्ये फ्लॅट एज डिजाईन देण्यात आली आहे जी गेल्यावर्षीच्या प्रो मॉडेल्समध्ये पाहायला मिळाली होती. परंतु ह्यातील नवीन अ‍ॅल्युमिनियम फ्रेम ह्या फोन्सचं वजन कमी करते. कंपनीनं हे आतापर्यंतचे सर्वात हलके आयफोन असल्याचं म्हटलं आहे.

दोन्ही मोबाईल फोनमध्ये तुम्हाला A16 Bionic चिपसेटचा सपोर्ट मिळतो जो कंपनीने गेल्या वर्षी iPhone 14 Pro मॉडेल्समध्ये दिला होता. फोटोग्राफीसाठी, दोन्ही फोनमध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप आहे ज्यामध्ये मुख्य कॅमेरा 48MP आहे तर दुसरा 24MP पोर्ट्रेट कॅमेरा आहे जो कमी प्रकाशात चांगलं कार्य करतो.

फ्रंड कॅमेरा तुम्हाला सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 12MP कॅमेरा मिळेल. दोन्ही मॉडेल्समध्ये दुसऱ्या पिढीची अल्ट्रा-वाइडबँड चिप आहे, त्यामुळे तुम्ही तुमची Apple डिव्हाइसेस सहजपणे शोधू शकता.

महत्त्वाच्या बातम्या

 बातम्यांसाठी Follow आणि Subscribe करा
Google News Follow
YouTube Subscribe