मनोज जरांगे पाटलांची ‘ही’ मागणी एकनाथ शिंदेंकडून मान्य

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

जालना | मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू केलेल्या उपोषणाचा आज 17 वा दिवस आहे. मात्र अद्याप मराठा आंदोलकांच्या मागणीवर अंतिम तोडगा निघू शकलेला नाही. मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडण्याची तयारी दाखवली होती. पण त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावं, अशी त्यांची मागणी होती. आता ही मागणी शिंदेंनी मान्य केलीये.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आंतरवाली सराटी गावामध्ये येतील अशी चर्चा होती. मुख्यमंत्र्यांचा दौरा निश्चित होता. पण काही कारणामुळे येणं शक्य झालं नाही. आता आज गुरुवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मनोज जरांगे पाटील यांची भेट घेणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जालन्यासाठी रवाना झाले आहेत. सकाळी 11 च्या सुमारास ते आंतरवाली सराटी गावामध्ये दाखल होतील, अशी माहिती आहे. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मनोज जरांगे पाटील उपोषण सोडतात का? याकडे आता लक्ष लागल आहे.

आरक्षणासाठी राज्य सरकार सकारात्मक पाऊल उचलेल. आम्ही तिघांनी त्यांच्या टीम सोबत चर्चा केली” असं रावसाहेब दानवे काल रात्री मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर म्हणाले. मराठा समाजाला कुणबी जातप्रमाणपत्र द्यावे, अशी मनोज जरांगे पाटील यांची मागणी आहे.

आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत उपोषण आंदोनलावर मार्ग निघेल अशी अनेकांना आशा आहे. मराठा समाजावर पोलिसांनी लाठीमार केल्यानंतर हे आंदोलन अधिक तीव्र झालं. 

महत्त्वाच्या बातम्या-