नागरिक संतापले! राज्यातील ‘या’ गावात राजकीय नेत्यांना बंदी

पुणे | महाराष्ट्राच्या राजकारणात आत्तापर्यंत अनेक मोठ्या घडामोडी घडल्या. सरकार (Goverment) आलं पडलं पुन्हा आलं या सर्व गोंधळात सामान्य माणूस भरडला जातो. राज्यातील जनतेचे अनेक प्रश्न असताना राजकीय नेते मात्र स्वत:चा स्वार्थ साधताना दिसतात. जनतेचं कोणाला काहीच पडलेलं दिसत नाही. अनेक ठिकाणी नागरिक राजकारण्यांवर संताप व्यक्त करताना दिसतात.

सध्या महाराष्ट्रातील राजकारणाला वैतागून तसेच मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून संतप्त झालेल्या नागरिकांनी राजकारण्यांना थेट गावात यायची बंदी घातली आहे. पुण्यातील इंदापूर तालुक्यातील पळसदेव येथील गावकऱ्यांनी सर्व पक्षातील नेत्यांना पुढाऱ्यांना गावात येण्यास बंदी घातली आहे.

जोपर्यंत आम्हाला आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत कोणत्याही पक्षाच्या राजकीय नेत्यांना आम्ही गावात प्रवेश देणार नाही, अशी भूमिका सकल मराठा समाजाने घेतली आहे. 

चुलीत गेले नेते आणि चुलीत गेले पक्ष आता फक्त मराठा आरक्षण लक्ष अशा पद्धतीचा मजकूर या बॅनरवर लिहिण्यात आला आहे. जोपर्यंत आम्हाला आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत कोणत्याही पक्षाच्या राजकीय नेत्यांना आम्ही गावात प्रवेश देणार नाही, असंही बॅनरवर लिहिण्यात आलं आहे. 

राज्यातले अनेक आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी मराठा समाजाचे आहेत. तरीही मराठा समाजाची परिस्थिती नीट नाही. त्यांना मूलभूत गोष्टींसाठी भांडावं लागत आहे, ही मोठी शोकांतिका आहे. त्यामुळे आरक्षण मिळत नाही तोपर्यंत पक्षाच्या नेत्यांनी येऊ नये, असा आक्रमक पावित्रा गावकऱ्यांनी घेतला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-