“एक वेळ गाढव, डुक्कर सुधारेल पण गोप्या सुधरणार नाही”

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर अत्यंत खोचक शब्दात टीका केलीये. पडळकरांच्या या वक्तव्याने आता राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. पडळकरांना अजित पवारांना लबाड लांडगा म्हटलं आहे.

गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी याआधीदेखील शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केलीय. पण आता अजित पवार सत्तेत आहेत. असं असतानाही त्यांनी अजित पवार यांच्यावर टीका केलीय. त्यामुळे पडळकरांच्या टीकेवरुन नवा वाद निर्माण होण्यची शक्यता आहे.

अजित पवार (Ajit Pawar) लबाड लांडग्याचं लबाड पिल्लू आहे आणि सुप्रिया सुळे (Supriya Sule) म्हणजे लबाड लांडग्याची लेक, अशी घणाघाती टीका गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.

गोपीचंद पडळकर यांनी धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवलं. पण त्यांनी अजित पवार यांना पत्र पाठवलं नाही. याबाबत गोपीचंद पडळकर यांना प्रश्न विचारला असता त्यांनी अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यावर खोचक टीका केली.

अजित पवार यांची भावना आमच्या विषयी स्वच्छ नाही. त्यामुळे आम्ही त्यांना पत्र देण्याची गरज नाही. ते लबाड लांडग्याचं लबाड पिल्लू आहे. त्यांना आम्ही मानत नाहीत. त्यामुळे मी त्यांना आम्ही कधी पत्र दिलं नाही आणि पुढेही पत्र देण्याची आम्हाला आवश्यकता वाटत नाही. ज्यांच्याकडून आम्हाला न्याय मिळू शकतो त्यांना मी पत्र दिलंय, अशी टीका गोपीचंद पडळकर यांनी केली.

पडळकरांच्या टीकेला अमोल मिटकरींचं प्रत्युत्तर

सुमारे 400 वर्षांपूर्वी गोप्यासारख्या विक्षिप्त जनावरासाठी जगद्गुरु तुकोबांनी हा अभंग लिहिला असावा. एक वेळ गाढव, डुक्कर सुधारेल पण गोप्या सुधरणार नाही, अशी टीका मिटकरींनी केलीये. तसेच उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी स्वतःला समाजाचा नेता म्हणून घेणाऱ्या आणि घरात आणि समाजात कवडीची किंमत नसलेल्या गोप्याला आवर घाला. उपमुख्यमंत्री अजितदादाबद्दल बोलताना तो त्याच्या लायकीच्या बाहेर बोलला आहे. याला आवर न घातल्यास आम्हाला आवरणं कठीण होईल, असं प्रत्युत्तर मिटकरींनी दिलंय.

महत्त्वाच्या बातम्या-