“मी अजित अनंतराव पवार, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतो की…”

बातम्या मिळवा आता थेट तुमच्या WhatsAppवर, इथं क्लिक करुन आजच जॅाईन व्हा

पुणे | दरवर्षी प्रमाणे यंदा सुद्धा पुण्यात (Pune Ganapati) गणपती निमित्त विविध प्रकारचे देखावे साकारण्यात आले आहेत. या वेळी राष्ट्रवादीच्या (NCP) कट्टर नेत्याने व अजित पवारांच्या (Ajit Pawar) चाहत्याने थेट अजितदादा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतानाचा देखावा साकारला आहे.

पुण्यातील नांदेड सिटीत (Nanded City) राहणारे राष्ट्रवादी काॅंग्रेस सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबा पाटील यांनी हा देखावा साकारुन सर्वांचं लक्ष वेधलं आहे. अजित पवार हे मुख्यमंत्रीपदाची (Ajit Pawar as an CM) शपथ घेणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. त्यामुळे त्यांनी ते देखावाच्या मार्फत दाखवलं. यामध्ये त्यांनी इतर राजकीय नेत्यांना मंत्र्याच्या रुपात दाखवलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi), अमित शाह (Amit Shah), राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या पासून बाॅलीवूडचे अभिनेते (Bollywood Actors) अमिताभ बच्चन, शाहरुख खान ,सलमान अमीर खान, रजनीकांत, नाना पाटेकर अशा सगळ्यांची उपस्थिती दाखवत हा देखावा साकारला आहे.

अजित पवार महाराष्ट्राचे मु्ख्यमंत्री व्हावेत अशी राष्ट्रवादीच्या कार्यक्रत्यांची इच्छा आहे. त्यासाठी देखील त्यांनी बाप्पाकडे साकडं घातलं आहे.

थोडक्यात बातम्या-