‘तुमच्या बापाकडून जमत नसेल तर…’; कोण कोणास म्हणाले?

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

सोलापूर | प्रहार संघटनेचे नेते आणि अपक्ष आमदार बच्चू कडू (Bachhu Kadu) यांनी शेतकऱ्यांच्या मुद्यावरून पुन्हा एकदा सरकारवर निशाणा साधला. सोलापुरात ‘शासन दिव्यांग्यांच्या दारी’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमादरम्यान आमदार बच्चू कडू यांची पत्रकार परिषद (Press Conferance) पार पडली. यावेळी ते बोलत होते.

रोग, कीड, भाव पडले तरीही शेतकऱ्यांना मदत द्यावी लागते. पण आमची सरकार दरबारी ही मदत बंद करून शेतमालाला रास्त भाव देण्याची मागणी आहे. हे तुमच्या बापाला जमत नसेल, तर उत्पादन खर्च कमी करा, असं बच्चू कडू यांनी म्हटलंय.

कायदा हा राजकारणी लोकांच्या हातातलं बाहुलं बनता कामा नये. कायद्याने आम्ही बाहुलं बनले पाहिजेत. आम्ही कायद्याचे सैनिक झाले पाहिजेत. तेव्हा काहीतरी रुपांतर होईल. नाहीतर मग ईडीची चौकशी फक्त एकाच पक्षावर होतेय. दुसऱ्या पक्षावर होतच नाही. मुळात मी हे बोलल्याने तुम्ही पुन्हा म्हणाल बच्चू कडू नाराज आहे. अरे पण मग खरं बोलणार तरी कोण?, असा सवाल बच्चू कडू यांनी केला आहे.

मुळात राज्य शासनाचा जीआर आहे की 33 टक्के पेक्षा जास्त नुकसान झाले तर शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळते. मग हा नियम असताना दुष्काळ वेगळा जाहीर करण्याची गरजच काय? दुष्काळ जाहीर करा. त्यासाठी कमिटी करा. हा रितीरिवाज जुना आहे.पूर्वी 50 टक्के पेक्षा जास्त नुकसान झाल्यावर दुष्काळ जाहीर केला जायचा. मात्र शासनाने तो 33 टक्क्यावर आणला आहे, असं बच्चू कडू म्हणालेत.

दुष्काळ जाहीर करा हे शब्द लोकांच्या तोंडात रुजले आहेत. दुष्काळ जाहीर केल्याने कुठे काय होतं? महसूल वगैरे कुठे माफ होतो का?, असा सवाल बच्चू कडू यांनी केला.

महत्त्वाच्या बातम्या-