एकनाथ खडसेंचा खळबळजनक दावा!

जळगाव | राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी खळबळजनक दावा केला आहे. शरद पवार (Sharad Pawar) यांना सोडण्यासाठी अजितदादा गटाच्या दोन बड्या नेत्यांनी आपल्याला फोन केले होते, असा खळबळजनक दावा एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी केलाय. ते जळगावमध्ये माध्यमांशी बोलत होते.

मी शरद पवारांचा (sharad pawar) पक्का शिलेदार आहे. त्यामुळे अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासोबत जाण्याचा प्रश्नच येत नाही. मला अजित पवारांनी त्यांच्यासोबत जाण्याबाबत विचारलं होतं. तसेच शरद पवार यांना सोडून अजितदादा गटात येण्यासाठी आमदार अमोल मिटकरी यांचाही मला फोन आला होता, असं खडसेंनी सांगितलंय.

एकनाथ खडसे यांनी शरद पवार(Sharad Pawar) यांना घट्ट पकडून राहावं. भाजपकडे येण्यासाठी हातपाय जोडू नये, असं मोठं वक्तव्य भाजपचे नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी केलं होतं. यावर पलटवार करत खडसेंनी मोठा गौप्यस्फोट केलाय. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.

राष्ट्रवादीत जायला आणि भाजपमध्ये जायला मी उतावीळ आहे. मी कधी त्यांच्याकडे आलो हे अजितदादांनी जाहीर करावं. उलट अजितदादांनीच मला विचारणा केली. मिटकरींनी फोन केला. एवढंच कशाला भाजपवालेही मला भाजपमध्ये येण्याचा आग्रह करतात. चंद्रशेखर बावनकुळे यांनी उघड बोलावलं तरीही मी त्यांच्याकडे गेलो नाही. मी भाजपकडे गेलो नाही तर अजित पवारांकडे कसं जाणार?, असा सवालच त्यांनी केला.

महत्त्वाच्या बातम्या-