बारामतीत सुप्रिया सुळेंना मोठा धक्का, पवार कुटुंबातून ‘ही’ व्यक्ती लोकसभेच्या रिंगणात?

बारामती | राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी बंड केलं, त्यानंतर त्यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर दावा केला. अजित पवार यांच्या बंडानंतर ते शरद पवार यांना सातत्याने भेटत होते. राजकीय भूमिका वेगळ्या असल्या तरी कुटुंब म्हणून एक असल्याचा दावा यानंतर केला गेला होता, मात्र आता या कुटुंबात मोठी ठिणगी पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

अजित पवार यांच्या बंडानंतर बारामती लोकसभा मतदारसंघात काय चित्र असेल?, याची चर्चा चांगलीच रंगली होती. सुप्रिया सुळे लोकसभेला निवडून येतील का?, हा मुद्दा सध्या चांगलाच चर्चेचा ठरला होता. आता याच लोकसभा मतदारसंघाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. सुप्रिया सुळे यांच्यासाठी ही अपडेट मोठा धक्का मानला जात आहे.

नेमका काय आहे हा प्रकार?

बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे यांचा पराभव करण्यासाठी भाजपने याआधी चांगलेच प्रयत्न केलेले पहायला मिळाले. सुरुवातीला महादेव जानकर भाजपने मैदानात उतरवलं. यावेळी महादेव जानकर यांना निसटता पराभव झाला, त्यानंतरच्या निव़डणुकीत भाजपने राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांना उमेदवारी दिली, मात्र त्यांना आपला करिश्मा दाखवता आला नाही. जानकर यांच्या मतांच्या आक़ड्यांमुळे सुप्रिया सुळे देखील सावध झाल्या होत्या त्यामुळे सुप्रिया सुळे सहज विजय झाल्या. गेल्या काही दिवसांतल्या घड़ामोडी पाहिल्या तर बारामतीमध्ये सातत्याने केंद्रीय मंत्र्यांचे दौरे आयोजित केले जात आहेत. त्यामुळे बारामती हातात घेण्यासाठी भाजपने जोरदार तयारी चालवल्याची चर्चा होती.

भाजपची आता नवीन खेळी?

अजित पवार यांनी बंडखोरी केल्यानंतर भाजपने आता नवा डाव टाकण्याची खेळी केल्याची चर्चा आहे. सुप्रिया सुळे यांना आव्हान देण्यासाठी पवार घराण्यातूनच कुणाला तरी उमेदवारी देण्याची भाजपची रणनीती आहे. याचाच भाग म्हणून अजित पवार यांच्या पत्नी आणि पवार कुटुंबातील पॉवरफुल सूनबाई सुनेत्रा पवार यांना निवड़णुकीच्या रिंगणात उतरवण्याचा विचार असल्याची माहिती आहे. असं झालं तर बारामतीत नणंद-भावजयी यांच्यात चुरशीची लढत होऊ शकते.

अजित पवार मान्य करतील का?

पवार कुटुंबात अद्याप कोणत्याही सूनबाई थेट निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या नाहीत. सुनंदा पवार यांनी आपले पूत्र रोहित पवार यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं, झेड पी सदस्या आणि त्यानंतर आमदारही केलं. सुनेत्रा पवार यांनी देखील आपल्या मुलांना राजकारणात सेट करण्याचा प्रयत्न केला. पार्थ पवार यांचा पहिला प्रयत्न फेल गेला, त्यानंतर आता जय पवार राजकारणात येणार असल्याची चर्चा आहे. अशात मुलांना राजकारणात सेट करायचं सोडून सुनेत्रा पवार स्वतः राजकारणात उतरतील का? हा मोठा प्रश्न आहे आणि त्याही पेक्षा अजित पवार यासाठी मान्यता देतील का हा मोठा प्रश्न आहे.

राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही. अजित पवार हे शरद पवार यांनी साथ सो़डून भाजपला जाऊन मिळतील याची कुणी कल्पना केली नव्हती. एकदा प्रयत्न फेल गेल्यानंतर त्यांनी दुसऱ्यांदा तसाच प्रयत्न केला आणि यशस्वी करुन दाखवला. आता सुप्रिया सुळे आणि अजित पवार विरोधात आहेत, त्यामुळे बारामती लोकसभेची जागा त्यांच्या वाट्याला आली तर त्यांना ती लढावी लागेल आणि जिंकावी सुद्धा लागेल त्यामुळे बारामतीत नेमकं चाललंय काय? याकडे साऱ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-