भाजपची मोठी खेळी?, ‘या’ नेत्याचं मुख्यमंत्रीपद जाणार?

भोपाळ | नुकतंच भाजपने (Bjp) मध्येप्रदेश विधानसभा निवडणुकीची दुसरी यादी जाहीर केली आहे. यानंतर मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान (Shivraj Sinh Chauhan) यांचं टेन्शन वाढल्याचं दिसत आहे.

मध्य प्रदेश (Madhya Pradesh) निवडणुकीसाठी भाजपने (Bjp) जाहीर केलेल्या यादीमध्ये एकून 39 जणांची नावं आहेत. यामध्ये केंद्रीय मंत्री, खासदार आणि दिग्गज नेते यंदाच्या निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहेत. त्यामुळे मुख्यमंत्रीपदासाठी भाजपने कुठल्याही नेत्याचं नाव घोषित केलं नाही.

यंदा सामूहिक नेतृत्वात निवडणूक लढवण्याचा निर्णय भाजपने घेतला असून निकालानंतर मुख्यमंत्रीपदाचा निर्णय घेण्यात येईल. निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर निवडणूक जिंकल्यास भाजपच्या कुठल्याही नेत्याला मुख्यमंत्रीपदाची लॉटरी लागू शकते.

मध्य प्रदेशातील संभाव्य पराभवाचे विजयात रुपांतर करण्यासाठी भारतीय जनता पक्षाने केंद्रीय मंत्री नरेंद्रसिंह तोमर, प्रल्हादसिंह पटेल आणि फग्गनसिंह कुलस्ते, चार विद्यमान खासदार गणेश सिंह, रीती पाठक, उदय प्रताप सिंह, राकेश सिंह आणि भाजप राष्ट्रीय सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय यांना तिकीट दिलं आहे. भाजपच्या दुसऱ्या यादीत मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना तिकीट मिळालं नाही. 

महत्त्वाच्या बातम्या-