नवी दिल्ली | दिल्ली मेट्रो (Delhi Metro) रील, कपल्सचा रोमान्स (Couple Romance) आणि तरुणींचा डान्स अशा अनेक गोष्टींमुळे कायम चर्चेत असते. जगातच्या कोपऱ्यात काही घडो पण दिल्ली मेट्रोमधील (Delhi Metro) व्हिडीओ कायम इंटरनेटवर व्हायरल होत असतात. कधी कधी मेट्रोमधील प्रवाशांमधल्या हाणामारीचा व्हिडीओ समोर येतो तर कधी कपल्स अश्लिल चाळे करताना दिसतात, असाच एक व्हिडीओ पुन्हा एकदा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
या व्हायरल व्हिडीओमध्ये कपल चालत्या मेट्रोच्या ऑटोमेटिक दरवाज्यांजवळ मिठी मारताना आणि किस करताना दिसत आहेत. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर लोकांनी संताप व्यक्त केला आहे.
व्हिडीओमध्ये धावत्या मेट्रोच्या दरवाज्याजवळ एक कपल एकमेकांच्या अगदी जवळ मिठीत असताना दिसून येतं आहे. ते फक्त एकमेकांना मिठी मारत नाही तर ते सार्वजनिक ठिकाणी किस करताना दिसून येत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, मेट्रोमध्ये प्रवाशांची गर्दी आहे. मात्र तरीही त्यांचं आजूबाजूला जराही लक्ष नाहीये.
आनंद विहार मेट्रो स्टेशनचा हा व्हिडीओ असल्याचा दावा यूजरने केला आहे. तसंच व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी याप्रकरणी दिल्ली मेट्रो कॉर्पोरेशनने कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
- राजकारण्यांची धक धक वाढणार!, ‘ही’ बडी अभिनेत्री निवडणुकीच्या रिंगणात?
- सीमा हैदर मायदेशी परतणार, मोठं कारण आलं समोर
- एकनाथ शिंदेंची धाकधूक वाढली; घेतला ‘हा’ मोठा निर्णय
- भाजपची मोठी खेळी?, ‘या’ नेत्याचं मुख्यमंत्रीपद जाणार?
- बारामतीत सुप्रिया सुळेंना मोठा धक्का, पवार कुटुंबातून ‘ही’ व्यक्ती लोकसभेच्या रिंगणात?