Sharad Pawar | शरद पवार यांना मोठा धक्का!

मुबंई | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना मोठा धक्का बसलाय. गरवारे क्लब निवडणुकीत शरद पवार यांच्या दोन दशकांच्या वर्चस्वाला धक्का बसला आहे. या निवणुकीत अध्यक्षपदासाठी शरद पवार (Sharad Pawar) यांनी बिनविरोध निवड झाली आहे. पण त्यांचं पूर्ण पॅनल पराभूत झालं आहे.

दक्षिण मुंबईत सर्वात मोठा क्लब आणि कोट्यवधींची वार्षिक उलाढाल असलेल्या गरवारे क्लबच्या निवडणुकीत शरद पवार यांना मोठा धक्का बसला आहे.

वार डेव्हलपमेंट ग्रुप विरुद्ध GCH डायनॅमिक ग्रुप या दोन पॅनलमध्ये लढत होती. जवळपास 13 हजार सामाजिक मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला होता. तीन दिवस ऑनलाईन आणि प्रत्यक्ष पद्धतीने मतदान झालं होतं.

13 जागांसाठी ही निवडणूक झाली होती. अध्यक्षपदी शरद पवारांची बिनविरोध निवड झाली. मात्र, मॅनेजमेंट कमिटीत शरद पवार पॅनलची एकही जागा निवडून आली नाही. डायनॅमिक पॅनलचे मनिष अजमेरा, मोहित चतुर्वेदी यांची रणनीती यशस्वी झाल्याची चर्चा सुरू आहे. डायनॅमिक पॅनलचे सायरस गोरिमार उपाध्यक्षपदी विराजमान होणार आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-