राजकारण्यांची धक धक वाढणार!, ‘ही’ बडी अभिनेत्री निवडणुकीच्या रिंगणात?

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

पुणे | बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित-नेने (Mahuri Dixit) राजकारणात प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगलीये. तसेच भाजप (Bjp) माधुरीला उमेदवारी देणार असल्याचं कळतंय.

लोकसभेच्या 2024 मध्ये होणाऱ्या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी आपली तयारी सुरु केली आहे. भाजपने मिशन 45 साठी चांगल्या उमेदवारांचा शोध सुरु केला आहे. चित्रपटसृष्टी गाजवणारी धक, धक गर्ल भाजपकडून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा पुणे, मुंबईचे दौरे करत आहे. आता भाजपने धक धक गर्ल माधुरी दीक्षित हिला उमेदवारी देण्याची तयारी सुरु केली आहे. अमित शाह यांच्या मुंबई दौऱ्यात काही नावांवर चर्चा झाली. त्यात माधुरी दीक्षित हिचे नाव असल्याची माहिती मिळाली आहे.

भाजप माधुरी दीक्षित हिला मुंबईतून उमेदवारी देणार असल्याचं म्हटलं जात आहे. यासंदर्भात दोन दिवासांपूर्वी अमित शाह यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आहे. त्यावेळी जळगाव, धुळे, पुणे लोकसभेचासाठी उमेदवारांच्या नावावर चर्चा झाली.

दरम्यान, पुणे लोकसभेसाठी इच्छूक उमेदवारांची संख्या मोठी आहे. पुणे लोकसभेसाठी गिरीश बापट यांच्या सून स्वरदा बापट, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, माजी आमदार मेधा कुळकर्णी, जगदीश मुळीक आणि माजी खासदार संजय काकडे या नावांची चर्चा आहे.

महत्त्वाच्या बातम्या-