राज्य सरकारचा मोठा निर्णय; ‘या’ दिवशी दिली सुट्टी

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | अनंत चतुर्दशी अर्थात गणेश विसर्जन उद्या गुरुवारी पार पडणार आहे. याच दिवस ईद-ए-मिलाद हा सण देखील आहे. पण ईद दुसऱ्या दिवशी साजरी करण्याचं मुस्लीम समुदयानं जाहीर केलं आहे. त्यामुळं गुरुवार अनंत चतुर्दशीची सार्वजनिक सुट्टी आहेच पण आता शुक्रवारी ईदची सुट्टी जाहीर करण्यात आली आहेत. त्यामुळं गुरुवार आणि शुक्रवार असे दोन दिवस सार्वजनिक सुट्टी असणार आहे. (Ganesh Visarjan Holiday on 29 September 2023 decision of Maharashtra government)

ऑल इंडिया खिलाफत कमिटीच्या शिष्टमंडळाने यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन विनंती केली होती. राज्यात शांततेचे वातावरण असावे आणि गर्दी तसेच मिरवणुकांचे नियोजन करता येणे पोलिसांना शक्य व्हावं म्हणून 29 तारखेस सुट्टी देण्याची विनंती त्यांनी केली होती. या शिष्टमंडळात खासदार राहुल शेवाळे, आमदार अबू आझमी, आमदार रईस खान, नसीम खान आदींचा समावेश होता.

शनिवार आणि रविवार असे दोन दिवस सुट्ट्यांचे आहेत. तर सोमवारी म्हणजे 2 ऑक्टोबर रोजी गांधी जयंतीची सुट्टी आहे. त्यामुळे सलग पाच दिवसांच्या सुट्ट्यांचा आनंद नागरिकांना घेता येणार आहे. 

यंदा गणेशोत्सव  आणि ईद-ए-मिलाद हे सण एकत्रच 28 सप्टेंबरला आले आहेत. यामुळे पोलीस प्रशासनावर बराच ताण येण्याची शक्यता वर्तवली जात होती. हाच ताण कमी करण्यासाठी मुस्लिम बांधवांकडून ईद- ए- मिलाद च्या दिवशी काढण्यात येणारा जुलूस किंवा मिरवणूक ही सप्टेंबर 29 म्हणजे एक दिवस नंतर काढण्यात येणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-