राष्ट्रवादीच्या नेत्याच्या नातवाचा अपघात; जागेवरच झाला मृत्यू

मुंबई | रेल्वे पुलाच्या कठड्याला धडकल्याने झालेल्या अपघातात (Accident) कार चालक साहिल वानखेडकर (Sahil Wankhedekar) याचा जागीच मृत्यू झाला. साहिल वानखेडकर माजी आमदार आणि राष्ट्रवादीचे नेते सीताराम घनदाट (Sitaram Ghandat) यांचा नातू असल्याचं कळतंय. ही घटना एनआरआय वसाहतीजवळ घडली.

साहिल कारने एनआरआय वसाहतीतून पामबीच मार्गालगतच्या सर्व्हिस रोडने बेलापूरच्या दिशेने जात असताना झालेल्या अपघातात तो कारबाहेर फेकला गेला व गंभीर जखमी झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

या अपघातानंतर कारने पेट घेतला. या घटनेची माहिती मिळताच एनआरआय पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन अग्निशमन दलाच्या मदतीने ही आग विझवली.

सीताराम घनदाट हे परभणी जिल्ह्यातील गंगाखेडचे माजी आमदार आहेत. तीन वर्षांपूर्वी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.

महत्त्वाच्या बातम्या-