शरद पवारांची नवी खेळी?; अजित पवार अडचणीत येणार?

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | राष्ट्रवादीत (NCP) फुट पडल्यानंतर राजकारणात एकच खळबळ उडाली. राष्ट्रवादीत अजित पवार (Ajit Pawaw) आणि शरद पवार (Sharad Pawar) असे दोन गट पडले. त्यानंतर या दोन्ही गटात दिवसेंदिवस वाद सुरु झाले. राष्ट्रवादी पक्षाच्या चिन्हावर दोन्ही गटातील नेत्यांनी दावा सांगितला असून दोन्ही गट निवडणूक आयोगाकडे गेले आहेत.

दरम्यान निवडणूक आयोग कोणाच्या बाजूने कौल देणार या कडे सगळयांच लक्ष लागलं आहे. हे सुरु असताना राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांची नवी खेळी समोर आली. अजित पवार यांना अडचणीत आण्याचा नवा डाव सुरु आहे. त्यावर आता अजितदादा काय प्रतिक्रिया देतात याकडे सर्वजण नजर ठेऊन आहेत. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड केलं होतं त्यावेळी अजितदादांनी एक विधान केलं होतं.

अजित दादांनी केलेलं ते वक्तव्य कोणतं?

ठाकरे (Thackeray) आणि शिंदे (Shinde) गटात फुट पडल्यानंतर अजितदादांनी पक्ष आणि चिन्हाच्या मुद्द्यावरून आपलं मत व्यक्त केलं. चिन्ह आणि पक्ष एकनाथ शिंदे यांना देण्याबाबतची भूमिका त्यांनी यावेळी मांडली होती. त्यांनी केलेलं हेच विधान आता त्यांच्या अगंलट यायची शक्यता आहे.

माध्यामांच्या माहिती नुसार निवडणूक आयोगाकडे शरद पवार गट अजित पवारांच्या या वक्तव्याविरोधात तक्रार दाखल करणार आहे. अजित पवार यांची इतर पक्षाबाबतची भूमिका आणि आताची भूमिका यातील फरकही आयोगाच्या लक्षात आणून दिलं जाणार आहे.

थोडक्यात बातम्या-

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचा मोठा प्लॅन!

गौतमी पाटीलविरोधात गुन्हा दाखल, नेमकं झालंय काय?

“…तर कॉन्ट्रॅक्टरला बुलडोझर खाली टाकीन”

 ‘महाराष्ट्रात जर पुन्हा हे घडलं तर…’; राज ठाकरे भडकले

आरोपीचा पाठलाग, पोलिसावर वार अन् मग फायरिंग… नांदेडमध्ये थरार