“यंदा आर्मी बोलवा, आम्हाला चिरडून टाका पण…”; संजय राऊतांचं शिंदेंना आव्हान

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | शिवसेनेत फुट पडल्यानंतर अनेक गोष्टींवरुन वाद होताना दिसत आहेत. गेल्यावर्षी प्रमाणे यंदाही ठाकरे आणि शिंदे गटात दसरा मेळाव्यावरुन (Dusshera Rally) वाद पेटण्याची शक्यता आहे. दादरच्या शिवाजी पार्क (Shivaji park) मैदानातच दसरा मेळावा पार पडावा म्हणून ठाकरे गटाचे नेते आणि संजय राऊत (Sanjay Raut) आक्रमक झाले आहेत.

काय म्हणाले संजय राऊत?

माध्यमांशी बोलत असताना संजय राऊत यांनी शिंदे गटाला बजावून सांगितलं, की आम्हाला चिरडून टाका किंवा आर्मी बोलवा. पण आमचा दसरा मेळावा हा शिवतीर्थावरच होईल. गेल्या वर्षी ठाकरे गटाने दसरा मेळावा शिवाजी पार्कच्या मैदानात घेतला होता. दरम्यान, यावेळी दोन्ही गटांनी एक महिन्यापूर्वीच मुंबई महापालिकेकडे मैदानासाठी अर्ज केला आहे.

खरा पक्ष आमचाच आहे, शिवाय पक्ष आणि चिन्ह सुद्धा आमच्याकडेच आहे. त्यामुळे यंदाच्या दसरा मेळावा शिवाजी पार्कवर घेण्यास आम्हाला परवानगी द्यावी, अशी मागणी शिंदे गटाने केली आहे. तर दुसरीकडे संजय राऊत म्हणाले, की “ज्या ठिकाणी शिवसेनेचा (Shivsena) दसरा मेळावा होतो, त्या ठिकाणी इतिहास रचला जातो. गेले 50 ते 55 वर्षापासून आम्ही दसरा मेळावा घेतोय. आता हे बेईमान लोक त्यावर दावा सांगत आहेत.”

हे मराठी माणसाची ताकद कमी करण्याचं षडयंत्र आहे. पुढे राऊतांनी मुख्यमंत्री शिंदेंना मराठी माणसांना मुंबईत घर नाकारली जात आहेत यावरुन टोला लगावला. मराठी माणसांची घरं बळकावली जात आहेत. याला एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि भाजप (BJP) जबाबदार आहेत, असं ते म्हणाले.

थोडक्यात बातम्या-

“…म्हणून गांधीजींसारखं दुसरं कुणी होणे नाही”

‘लिपस्टिक आणि बॉबकटवाल्या महिलाच…’; ‘या’ नेत्याची जिभ घसरली

राष्ट्रवादीच्या नेत्याच्या नातवाचा अपघात; जागेवरच झाला मृत्यू

शरद पवारांची नवी खेळी?; अजित पवार अडचणीत येणार?

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचा मोठा प्लॅन!