16 आमदारांच्या अपात्रतेबाबत कायदेतज्ज्ञ असीम सरोदेंचं मोठं वक्तव्य

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रात सत्तासंघर्ष सुरू आहे. 16 आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात अद्यापही निर्णय झाला नाही. सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना निर्देश दिल्यानंतर अखेर सुनावणीस सुरुवात झाली आहे. आता या संदर्भात कायदेतज्ज्ञ असीम सरोदे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

विधानसभा अध्यक्षांनी 16 आमदारांच्या अपात्रतेबद्दल चुकीचा निर्णय घेतला, तर सर्वोच्च न्यायालय हस्तक्षेप करून ताशेरे ओढू शकतं किंवा आदेशही देऊ शकतं, असं मोठं वक्तव्य असीम सरोदे यांनी केलं आहे.

विधानसभा अध्यक्षांना कुणीच आदेश देऊ शकत नाही. त्यांच्या कामात कुणीही हस्तक्षेप करू शकत नाही, हे कायद्याचं वास्तव आहे. परंतु विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर जेव्हा ट्रीब्युनल म्हणून काम करतात. जेव्हा त्यांच्यासमोर खटला चालवला जातो, तेव्हा ते न्यायाधिकरण असतं, असं असीम सरोदे म्हणालेत.

भारतातील कोणतंही न्यायाधिकरण असलं तर ते कायद्यानुसार काम करतंय की नाही? या संदर्भातील शहानिशा आणि विश्लेषण करण्याचे सर्व अधिकार सर्वोच्च न्यायालयाला आहेत, असंही त्यांनी सांगितलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-