मुंबई | कल्याण रेल्वे स्थानकातील स्कायवाॅकवर फेरिवाल्यांकडून खरेदी केलेली वस्तु खराब असल्याने ती परत करत एका तरुणाने पैसे मागितले. परंतु पैसे देण्यास नकार देत तुम्ही मराठी लोक असेच असतात अशी उपरोधिक शब्दात फेरिवाल्याने टिपण्णी केली. यावरून झालेल्या वादानंतर मनसैनिकांनी घटनास्थळी येऊन फेरीवाल्यांना चोप दिला.
वाचा नेमकं काय घडलं?
शहापूर तालुक्यातील वासिंद भागात राहणारा एक मराठी तरूण कामानिमित्त कल्याणमध्ये आला होता. काम आटोपल्यानंतर तो कल्याण रेल्वे स्थानकातून आसनगाव लोकलने घरी जाणार होता.
कल्याण रेल्वे स्थानकातील स्कायवॉकवर एका फेरीवाल्याकडून तरुणाने एक वस्तू पैसे देऊन खरेदी केली. ती वस्तू खराब वाटली म्हणून तरुणाने ती परत करुन फेरीवाल्याकडून पैसे परत मागितले. फेरीवाल्याने पैसे देण्यास नकार दिला. त्यावेळी तरुणाने वस्तू खराब आहे म्हणून ती परत केली. तू माझे पैसे परत कर, असा तगादा लावला.
इतर परप्रांतीय फेरीवाले या तरुणाभोवती जमा होऊन हुल्लडबाजी करू लागले. इतर फेरीवाले तरुणाशी वाद घालू लागले. तरुणाने मी मनसैनिकांना बोलवतो, असा इशारा दिला. त्यावेळी तु कोणालाही बोलव जा. ते आमचे काही करणार नाहीत, असा उलट इशारा फेरीवाल्याने दिला.
महत्त्वाच्या बातम्या-
- ‘मराठ्यांना डिवचल्यावर…’; मनोज जरांगे पाटलांचा थेट छगन भुजबळांना इशारा
- 16 आमदारांच्या अपात्रतेबाबत कायदेतज्ज्ञ असीम सरोदेंचं मोठं वक्तव्य
- “यंदा आर्मी बोलवा, आम्हाला चिरडून टाका पण…”; संजय राऊतांचं शिंदेंना आव्हान
- “…म्हणून गांधीजींसारखं दुसरं कुणी होणे नाही”
- ‘लिपस्टिक आणि बॉबकटवाल्या महिलाच…’; ‘या’ नेत्याची जिभ घसरली