‘GST चे 19 कोटी लोकवर्गणीतून जमा करून थोबाडावर मारू…’; मुंडे समर्थक लागले कामाला

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

बीड | भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याकडे 19 कोटींची जीएसटी रक्कम थकल्याने वैद्यनाथ कारखान्यावर जीएसटी आयुक्तालयाकडून कारवाई करण्यात आली. त्यानंतर पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी प्रतिक्रिया देताना केंद्र सरकारवर नाराजीही व्यक्त केली. आता अडचणीत सापडलेल्या पंकजा मुंडेंसाठी त्यांचे समर्थक कामाला लागले आहेत.

फक्त 19 कोटींसाठी आमचे दैवत मुंडे साहेबांचा आत्मा वैद्यनाथ कारखाना बदनाम करत असाल, तर… फक्त दोनच दिवसांत आम्ही मुंडे भक्त लोकवर्गणीतून ती रक्कम तुमच्या थोबाडावर फेकून मारू, अशा आशयाची पोस्ट मुंडे समर्थक असलेल्या अर्जुन ढाकणे यांनी केली आहे.

पंकजा मुंडे यांच्या कारखान्यावर जीएसटी आयुक्तालयाने 19 कोटी रुपयांच्या जीएसटीप्रकरणी नोटीस बजावली आहे. यानंतर मुंडे समर्थकांनी सोशल मीडियातून संतापवजा नाराजी व्यक्त केली आहे. कारखान्यावर ज्या रमकेसाठी नोटिशीची कारवाई केली. त्यावर ही रक्कम आम्ही लोकवर्गणीतून जमा करू आणि ती थोबाडावर फेकून मारूर, असं म्हटलं आहे.

मुंडे समर्थक मदतीसाठीही सरसावले आहेत. अगदी एक लाख रुपयांपासून 50 लाख रुपयांपर्यंत मदतीचे धनादेश गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या नावाने लिहून तयार आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-