बातम्या मिळवा आता थेट तुमच्या WhatsAppवर, पुढील लिंकवर क्लिक करुन आजच जॅाईन व्हा-
मुंबई | सामनाच्या (Samna) अग्रलेखातून ठाकरे गटाकडून पुन्हा एकदा भाजपवर (Bjp) आणि केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडण्यात आलं आहे. भारतीय जनता पक्ष ही आज ‘पब्लिक कंपनी’ म्हणजे लोकांचा सहभाग असलेला पक्ष नाही, अशी टीका सामनातून करण्यात आलीये.
भारतीय जनता पक्ष भागधारक, भांडवलदार, व्यापारी, गुंतवणूकदार लोकांचा प्रायव्हेट पक्ष बनला आहे. काँग्रेसने सार्वजनिक उपक्रमांचा पाया रचला. हा पाया श्री. मोदी प्रा. लिमिटेड कंपनीने मोडून विकून खाल्ला, अशी खोचक टीका अग्रलेखातून मोदींवर (Narendra Modi) करण्यात आलीये.
तेलंगणातील शेतकऱ्यांची स्थिती देशात उत्तम आहे. महाराष्ट्रात शिवसेनेने, ‘ठाकरे’ घराण्याने सामाजिक, राजकीय वारसा निर्माण केला. मोदी-शहा यांना कोणताही वैचारिक, सांस्कृतिक वारसा नाही. ते आले तसे जातील. त्यांचे नामोनिशाणही इतिहासात राहणार नाही. अंध भक्तांच्या कुजबुजीवर वारसा टिकत नाही. त्यासाठी जमिनीत व लोकांच्या मनात रोपटे पेरावे लागते. दुसऱ्यांनी लावलेली रोपटी उपटून स्वतःचा विचार कसा पेरणार?, असा सवाल सामनातून करण्यात आलाय.
दरम्यान, मोदी यांची घराणेशाहीबाबतची भूमिका ढोंगी असल्याचं सामना अग्रलेखात म्हणण्यात आलं आहे. यावेळी लालकृष्ण अडवाणी यांचा दाखलाही देण्यात आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
- “तीन इंजिनं लागूनही राज्याचं आरोग्य व्हेंटिलेटरवर असेल तर काय उपयोग?”
- ‘GST चे 19 कोटी लोकवर्गणीतून जमा करून थोबाडावर मारू…’; मुंडे समर्थक लागले कामाला
- ‘फक्त सहा महिने…’; ठाकरे गटाच्या नेत्याचं मोठं वक्तव्य
- “संजय राऊतांसारख्या ढेकणाला मारण्यासाठी सैन्याची गरज नाही ते…”
- महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा ट्विस्ट; ‘या’ नेत्याला खुली ऑफर