बातम्या मिळवा आता थेट तुमच्या WhatsAppवर, पुढील लिंकवर क्लिक करुन आजच जॅाईन व्हा-
नवी दिल्ली | देशात गुन्हेगारीचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. तसेच राजकारणात देखील अनेक गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले नेते येत असल्याचं पाहायला मिळतंय. हे रोखण्यासाठी आता निवडणूक आयोगाने (Election Commission) कठोर पावलं उचलायला सुरूवात केली असल्याचं दिसत आहे. गुन्हेगारांचा राजकारणातील प्रवेश रोखण्यासाठी निवडणूक आयोगान पाऊल उचललं आहे. नव्या नियमानुसार गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीला तिकीट का दिलं, याचं स्पष्टीकरण राजकीय पक्षांना वृत्तपत्रातून द्यावं लागणार आहे.
जयपूरमध्ये माध्यमांशी संवाद साधतना मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार (Rajiv Kumar) म्हणाले की, निवडणूक आयोग मुक्त आणि निष्पक्ष निवडणुकांसाठी कटिबद्ध आहे. यासाठी गुन्हेगारांचा राजकारणातील प्रवेश रोखण्यासाठी निवडणूक आयोगान पाऊल उचलले आहे. गुन्हेगारांना पक्षाने उमेदवारी का दिली? याचं उत्तर राजकीय पक्षांना सांगावं लागणार आहे.
राजस्थानमध्ये पहिल्यांदाच घरबसल्या मतदान करण्याची सुविधा वृद्ध मतदारांना तसेच 40 टक्के अपंग असलेल्या लोकांना उपलब्ध होणार आहे. सक्तीच्या मतदानाचा कोणताही प्रस्ताव निवडणूक आयोगापुढे नाही.
दरम्यान, दरम्यान, गुन्हेगारांना राजकारणात नो एन्ट्री देण्याच्या निवडणूक आयोगाच्या या निर्णयाचं सामान्य जनतेकडून स्वागत होत आहे. राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगढ अशा पाच राज्यांमध्ये लवकरच विधानसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांपासूनच राजकारणाच्या स्वच्छतेची ही मोहीम सुरू होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
- “एकनाथ शिंदे, थोडी जरी लाज शिल्लक असेल तर राजीनामा द्या”
- “मोदी-शहा आले तसे जातील, त्यांचं नामोनिशाणही इतिहासात राहणार नाही”
- “तीन इंजिनं लागूनही राज्याचं आरोग्य व्हेंटिलेटरवर असेल तर काय उपयोग?”
- ‘GST चे 19 कोटी लोकवर्गणीतून जमा करून थोबाडावर मारू…’; मुंडे समर्थक लागले कामाला
- ‘फक्त सहा महिने…’; ठाकरे गटाच्या नेत्याचं मोठं वक्तव्य