अजित पवार नाराज?; हे कारण आलं समोर

मुंबई | राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक पार पडली आहे. या बैठकीत अनेक मुद्द्यावर चर्चा करण्यात आली आहे. पण उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) या बैठकीला उपस्थित नव्हते, अशी माहिती समोर आली आहे. पण त्यांच्या अनुपस्थितीवरुन राजकीय वर्तुळात जोरदार चर्चांना उधाण आलं आहे.

अजित पवार (Ajit Pawar) हे आजारी असल्याने मंत्रिमंडळ बैठकीला गेले नाहीत. अजित पवार हे सध्या त्यांच्या देवगिरी निवासस्थानी आहेत. ते आजारी असल्याने बैठकीला उपस्थित राहू शकले नाहीत. पण त्यांच्या अनुपस्थितीवरुन राजकीय वर्तुळात जोरदार चर्चांना उधाण आलं आहे.

गणोशोस्तवाच्या काळात अनेक लोकांनी ‘वर्षा’ या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जाऊन दर्शन घेतलं. मात्र यावेळी अजित पवार वर्षा बंगल्यावर गेले नव्हते. यावेळीही त्यांच्या अनुपस्थितीमुळे ते नाराज असल्याच्या रंगू लागल्या होत्या.

दरम्यान, अजित पवार कोणत्याही प्रशासकीय बैठकांना टाळत नाहीत. असं असताना ते आजच्या महत्त्वाच्या मंत्रिमंडळ बैठकीला गैरहजर राहिल्याने चर्चांना उधाण आलंय.

महत्त्वाच्या बातम्या-