राष्ट्रवादीचा माजी खासदार ठाकरे गटाचा उमेदवार?

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसलीये. अशातच यंदाची निवडणूक शिवसेना (Shivsena) आणि राष्ट्रवादीत (Ncp) फूट पाडून स्थापन झालेल्या महायुतीमुळे अत्यंत चुरशीची ठरणार आहे. ठाकरेंचं लक्ष मुंबईकडे असून मुंबईतील सहापैकी चार जागांसाठी ठाकरे गट आग्रही असल्याचं बोललं जात आहे.

लोकसभेसाठी दक्षिण मुंबई आणि उत्तर पश्चिम मुंबईसाठी उमेदवारांच्या नावांची निश्चिती ठाकरे गटाकडून करण्यात आली. मात्र ईशान्य मुंबईसाठी कोण? हे मात्र उद्धव ठाकरेंचं ठरत नव्हतं. ईशान्य मुंबईत राज्यसभा खासदार संजय राऊत यांच्या नावाचीही चर्चा होती. संजय राऊत यंदा लोकसभेच्या रिंगणात उतरणार असल्याचं बोललं जात होतं. पण आता ठाकरेंनी या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

ईशान्य मुंबईतून संजय राऊत नाहीतर राष्ट्रवादीचे माजी खासदार संजय दीना पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. यामुळे राष्ट्रवादीचा माजी खासदार ठाकरे गटाचा उमेदवार असणार आहे.

संजय दीना पाटील हे 2004 साली आमदार राहिले आहेत तर 2009 ला ते खासदार होते. तसेच काही वर्षांपूर्वी संजय दीना पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. मनोज कोटक हे ईशान्य मुंबईतून भाजप खासदार आहेत. भाजपने पुन्हा त्यांना संधी दिल्यास मनोज कोटक विरुद्ध संजय दिना पाटील असा संघर्ष पाहायला मिळेल.

महत्त्वाच्या बातम्या-