नवी दिल्ली | केंद्र सरकारने (Central Goverment) मोठा निर्णय घेतला आहे. आता उज्जवला योजनेच्या लाभार्थ्यांना गॅस सिलेंडर 600 रूपयांमध्ये मिळणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला आहे.
पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या या घोषणेचा फायदा उज्ज्वला योजनेतील कोट्यावधी नागरिकांना होणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर (Anurag Thakur) यांनी याबाबतची घोषणा केली.
सरकारने (Goverment) याआधी 37 दिवसांपूर्वीच याबाबतची मोठी घोषणा केली होती. त्यानंतर पुन्हा एकदा सरकारने निर्णय घेत सर्वसामान्यांना दिलासा दिला आहे. याआधी केंद्र सरकारकडून उज्ज्वला योजनेतील ग्राहकांना 200 रुपये सबसिडी दिली जात होती. आता आणखी 100 रुपयांची सबसिडी वाढवण्यात आली आहे.
याआधी रक्षाबंधन आणि ओणमच्या निमित्ताने केंद्र सरकारने 200 रुपयांचं अनुदान जाहीर केलं होतं. ही किंमत 1100 रुपयांवरून 900 रुपयांपर्यंत कमी झाली. उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना 700 रुपयांना गॅस मिळू लागला होता.
महत्त्वाच्या बातम्या-