आता ‘या’ जिल्ह्यातही गौतमी पाटीलला नो एन्ट्री!

मुंबई | महाराष्ट्राची नृत्यांगणा म्हणून सध्या गौतमी पाटीलची(Gautami Patil) चर्चा असते. गेल्यावर्षी एका कार्यक्रमात गौतमीने आक्षेपार्ह डान्स स्टेप केल्यामुळे लोकांनी तिच्यावर टीका करत तिचा कार्यक्रम बंद करण्याची मागणी केली होती. मात्र घडलेल्या प्रकारानंतर गौतमीने सगळ्यांची माफी मागितली.

गौतमीेने त्यानंतर तिची चुक दुरुस्त करत पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनात घर केलं. आज गौतमीला पाहण्यासाठी पुरुषवर्ग आणि महिलावर्ग तुफान गर्दी करत असतात. अनेकवेळा तिच्या कार्यक्रमात गोंधळ सुद्धा उडाला आहे. त्यामुळे पोलिसांची कायम फजिती होत असताना दिसते. मात्र काही ठिकणी गौतमीचे कार्यक्रम नाकारले जात आहेत.

कोल्हापूरात याआधी गौतमीचा कार्यक्रमासाठी स्वत: पोलीसांनी परवानगी नाकारली असताना आता सिंधुदुर्गातही गौतमीच्या कार्यक्रमाला नो ए

न्ट्री आहे. येत्या 7 आणि 8 ओक्टबरला सिंधुदुर्ग (Sindhudurg) येथे कुडाळ आणि कणकवलीमध्ये गौतमीचा डीजे डान्स शो आयोजित करण्यात आला होता. मात्र अनेकांनी या कार्यक्रमाला विरोध दर्शवल्यानंतर आयोजकांनी तांत्रिक कारण देत कार्यक्रम रद्द केला. 

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम ‘चला हवा येऊ द्या’तील कलाकार हा कार्यक्रम करणार आहेत. या कार्यक्रमाच्या तिकीट विक्रीला सुरुवात झाली आहे.

थोडक्यात बातम्या-

दिल्लीत मोठी घडामोड; राज्यातील 20 आमदार राष्ट्रपतींच्या भेटीला

मोठी बातमी! पुण्याचं पालकमंत्रीपद अजित दादांकडे

मोठी बातमी! खासदार हेमंत पाटील अडचणीत

राष्ट्रवादीचा माजी खासदार ठाकरे गटाचा उमेदवार?

“सत्ताधारी गटातील एकही आमदार दारात उभा करण्याच्या लायकीचा नाही”