मुंबई | भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी पुन्हा एकदा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर निशाणा साधला आहे.अनेकांचा बुरखा फडण्याचे काम फडणवीस साहेबांनी केले. जो, आपल्या आयुष्यात कधीच खरं बोलला नाही, तो फडणवीस साहेबांवर टीका करतो. राऊतांमध्ये हिम्मत असेल तर खुल्या व्यासपीठावर यावं, असं आव्हान नितेश राणेंनी (Nitesh Rane) संजय राऊतांना दिलं आहे.
संजय राऊत (Sanjay Raut) व उबाटा यांना संजय सिंह यांच्याबद्धल सहानुभूती आहे, कारण ते साडेसात नंतर एकत्र येणारे मित्र आहेत. संजय राऊत मोठा खोटारडा आहे. घर चालवण्यासाठी शिंदे साहेबांकडून पैसे घ्यायचा, अशी टीका नितेश राणेंनी (Nitesh Rane) केलीये.
पत्रकारितेला काळिमा फासतात. चीन व पाकिस्तानच्या बाजूने अग्रलेख लिहितात. सामना वृत्तपत्रात येणारा पैसा कुठून येतो त्याची चौकशी करावी, राऊत सतत देश विरोधी भूमिका घेतोय, असं नितेश राणेंनी म्हटलंय.
दरम्यान, उद्धव ठाकरेंचं (Uddhav Thackeray) नाव सुचवा, असं सिल्वर ओकमध्ये जाऊन कोण रडलं, हे सुद्धा आम्ही सांगू. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) मुख्यमंत्री बनणार हे जेव्हा संजय राऊत यांना समजलं, तेव्हा त्याने उद्धव ठाकरेंना काय काय शिव्या घातल्या याचे पुरावे आम्ही देऊ, असं नितेश राणे म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या-