इंडिया आघाडीमध्ये आता ‘हा’ बडा नेता सामील होणार?

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर(Prakash Ambedkar) यांची लवकरच इंडिया(I.N.D.I.A) आघाडीत एन्ट्री होणार असल्याची माहिती समोर आली. काही दिवसांपूर्वी सर्वविरोधी पक्ष एकत्रित येऊन इंडिया आघाडीत सहभागी झाले. मात्र वंचित बहुजन(Vanchit Bahujan Aghadi) आघाडीला यामध्ये सामील केलं नसल्याने प्रकाश आंबेडकर नाराज होते. आता लवकरच वंचित आघाडीला इंडियामध्ये सामील करणार असल्याची माहिती समोर आली.

वंचित बहुजन आघाडीला इंडीया आघाडीमध्ये एन्ट्री

इंडियामध्ये सर्वविरोधी पक्षांना आमंत्रित करण्यात आलं होतं. मात्र इंडिया आघाडीत वंचितला सहभागी करून घेण्यासंदर्भात कुठलीही भूमिका काँग्रेस(Congress) -राष्ट्रवादी काँग्रेस(National Congress Party) घेण्यात नव्हती आली. दरम्यान आता लवकरच वंचित आघाडीला यामध्ये सामील करणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. माध्यमांशी बोलत असताना राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी ही माहिती दिली आहे.

वंचित बहुजन आघाडीला सहभाग न केल्यामुळे प्रकाश आंबेडकर राष्ट्रवादीवर साततत्यानं टीका करत होते. तसेच राज्यात सर्व लोकसभेच्या जागांवर उमेदवार उभे करण्याचा इशारा प्रकाश आंबेडकरांनी दिला. दरम्यान इंडिया आघाडीची बैठक झाली त्यावेळेस वंचित बहुजन आघाडीला आमंत्रण नव्हतं. इंडिया आघाडीमध्ये सहभागी होण्यासंदर्भात प्रकाश आंबेडकर उद्या आपली भूमिका मांडणार आहे. 

थोडक्यात बातम्या-

खलिस्तान्यांकडून तिरंग्याचा अपमान मात्र… पुणेकराचं कृत्य पाहून तुम्हाला वाटेल अभिमान

“भाजप मित्र म्हणून जवळ घेतो आणि…”

“या माणसाने देशाचं वाटोळं केलं, टोपी घातली म्हणजे कुणी गांधी होत नाही”

मोठी बातमी! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दुसऱ्यांदा दिल्लीत

“संजय राऊत खोटारडा, घर चालवण्यासाठी शिंदे साहेबांकडून पैसे घ्यायचा”