खलिस्तान्यांकडून तिरंग्याचा अपमान मात्र… पुणेकराचं कृत्य पाहून तुम्हाला वाटेल अभिमान

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

लंडन | खलिस्तानी (Khalistani) दहशतवादी हरदीप सिंह निज्जरची हत्या आणि कॅनडाने भारतावर आरोप केल्यानंतर दिवसेंदिवस हा वाद वाढतच चालला आहे. अशात ब्रिटनची राजधानी लंडनमध्ये भारतीय उच्चायुक्तालयाबाहेर खलिस्तानवाद्यांनी तिरंग्यावर गोमूत्र ओतून आपल्या तिरंग्याचा अपमान केल्याची घटना समोर आली होती. ही घटना प्रत्येक भारतीयाला चीड आणून देणारी आहे. या दरम्यान एका मुलाने हा तिरंगा आदराने उचलून ठेवला. ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. सत्यम सुराणा असं या मुलाचं नाव आहे. सत्यमने केलेल्या या कृत्याचा प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटेल.

सत्यम सुराणा कोण आहे?

सत्यम सुराणा पुण्यातला असून तो व्यवसायाने वकील आहे. सध्या लंडनमध्ये राहून तो ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमधून पोस्ट ग्रॅज्युएशन म्हणजेच एलएलएम कायद्याचं शिक्षण घेत आहे. सत्यम सोशल मीडियावर कौतुक केलं जात आहे.

नेमकं काय घडलं जाणून घेऊयात?

सत्यम सुराणा याने या घटनेबद्दल सोशल मीडियावर लिहिलं आहे. 2 ऑक्टोबर 2023 रोजी खलिस्तानी दहशतवादी गुरचरण सिंग यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झालं. यावेळी आंदोलक खलिस्तानींनी तिरंग्याला लाथ मारली आणि नंतर तो भारतीय उच्चायुक्तालयाच्या भिंतीवर लावला आणि त्यावर बाटलीत आणलेलं गोमूत्र ओतलं.

हे सगळं घडत असताना तिथे असलेले इतर भारतीय तिरंग्याचा अवमान करताना शांत राहिले नाहीत. या खलिस्तानींमध्ये सत्यम सुराणा घुसला आणि तिरंगा शांतपणे उचलून बाजूला झाल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. सत्यम तिरंगा उंचावण्याआधी एक ब्रिटीश पोलिसही त्यावर उभा असल्याचं दिसत आहे. मात्र त्याने तिरंग्यावर जाणूनबुजून पाऊल ठेवलं की नकळत घडलं हे अद्याप समजू शकलं नाही.

महत्त्वाच्या बातम्या-