“अंधारेबाई संबंध नसताना नातवाला राजकारणात ओढाल तर…”

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | गणपती विसर्जन दिवशी राज्यात सगळीकडे डीजे सुरु होते. पुणे, मुंबई तसे अन्य ठिकाणी डॅालबीचे मोठमोठ्या आवाजात वाजत होते. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे(Raj Thackeray) यांनी यावर बोट ठेवत आपल्या अधिकृत X वर डॅालबी आणि डीजेच्या कर्कश आवाजावर एक पोस्ट शेअर केली होती.

राज ठाकरे यांनी ट्विट केलेल्या त्या पोस्टवर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या(UBT) नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी खोचक टीका केली. त्या म्हणाल्या की, “एका मोठ्या नेत्याच्या घरासमोरून मिरवणूक चालली. त्याच्या डीजेचा नातवाला त्रास झाला म्हणून लगेच चर्चा. अनेक वर्ष लेझरमुळे अनेक जणांची दृष्टी जाते तेव्हा काय होतं? त्यांनी केलेल्या या टीकेवर राज ठाकरे यांच्या धर्म पत्नी शालिनी ठाकरे(Shalini Thackeray) यांनी सुषमा आंधारेंवर निशाणा साधत त्यांना पत्र लिहिलंय.

शालिनी ठाकरे यांनी पत्रात काय लिहिलं?

शालिनी ठाकरे सुषमा आंधारेंना पत्र लिहित म्हणाल्या की, ‘संबंध नसताना जर राज ठाकरेंच्या नातवावर राजकारणासाठी बोललात, तर मनसेची महिला सेना तुमच्या कानाजवळ डीजे वाजवेल. ‘हिंदू सणांमध्ये डीजे आणि लेझर लाईटमुळे होणारा त्रास याबाबत रोखठोक भूमिका घेऊन विरोध केला.

कुटुंबाला राजकारणात ओढायची तुमच्या ‘गट’प्रमुखांची सवय तशी जुनीच. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांच्या नातवाला राजकारणात ओढलं. मग तुमच्यासारखे चेले-चपाटे तरी कसे मागे राहतील? यातूनच तुमच्या पक्षाची संस्कृती दिसते’ तुम्हाला सुद्धा मुलगा आहे. स्वार्थी राजकारणापोटी तिच्याबाबत कोणी अशी वक्तव्ये केली, तर ती तुमच्या मनाला रुचतील का?, असा प्रश्न देखील अंधारेंनी विचारला.

थोडक्यात बातम्या-

‘गुवाहटी, गोव्याला जाऊन मौजमजा करण्यासाठी पैसे आहेत पण…’; उद्धव ठाकरे संतापले

“महाराष्ट्रात यमाचा रेडा फिरतोय, त्यावर मुख्यमंत्री अन् दोन उपमुख्यमंत्री बसलेत”

‘…म्हणून ससून रूग्णालयात जास्त मृत्यू होतात’, धक्कादायक माहिती समोर

जयंत पाटलांचा मोठा दावा, अजित पवार टेंशनमध्ये?

“ठाकरेंचं नाव घेतल्यावर मला जेवण जात नाही”