शरद पवारांचा मोठा डाव; अजित पवारांसह त्यांचे आमदार अडचणीत?

मुंबई | उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या गटातील आमदारांना अडचणीत आणण्यासाठी शरद पवार (Sharad Pawar) यांच्या गटाने मोठी खेळी खेळली आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या गटाच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी एक याचिका दाखल केलीये.

जयंत पाटील यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. सुप्रीम कोर्टात धाव घेत जयंत पाटील यांनी अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या आमदारांवर कारवाई करण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्षांना द्यावेत, अशी विनंती याचिका दाखल करुन करण्यात आली आहे.

अजित पवार यांनी घेतलेला निर्णय हा पक्षाच्या विरोधात आहे. त्यामुळे पक्षबंदी कायद्यानुसार अजित पवारांसोबत गेलेल्या आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्यात यावी, अशी याचिका जयंत पाटील यांनी दाखल केली. पण त्यांच्या या याचिकेवर विधानसभा अध्यक्षांनी सुनावणी घेतली नाही.

दरम्यान, अजित पवारांसह आमदारांना अडचणीत आणण्यासाठी पवारांनी मोठी खेळी केलीये. आता आमदारांच्या अडचणीत वाढ होते का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-