“भाषणावर आमदार निवडून येत असते तर आज…”

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | राष्ट्रवादी अजित पवार (Ajit Pawar) गटातील विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी मनसे अध्यक्ष राज ठकारे (Raj Thackeray) यांच्यावर टीका केली. आता यावरून राष्ट्रवादी अजित पवार (Ajit Pawar) गट आणि मनसेतील आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीने राज्यातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.

मिटकरींनी यापूर्वीही राज ठाकरेंची (Raj Thackeray) मिमिक्री करून अनेकदा मनसेला डिवचण्याचा प्रयत्न केला होता. आता पुन्हा त्यांनी मनसेवर टीका केलीये.

आमदार अमोल मिटकरी यांनी एका भाषणात बोलताना राज ठाकरेंना टोला लगावला. पक्ष वाढवण्यासाठी भाषण महत्त्वाचे नसते, तर बूथनुसार काम करावं लागतं. कार्यकर्त्यांना बळ द्यावं लागतं. भाषणावर आमदार निवडून येत असते, तर आज राज ठाकरे मुख्यमंत्री असते, असं मिटकरी म्हणाले.

राज ठाकरेंना मिटकरींनी लागावलेला टोला मनसेच्या जिव्हारी लागला. याला उत्तर देताना मनसे नेते अमेय खोपकरांनी मिटकरींना सज्जड दम दिला

महत्त्वाच्या बातम्या-