मुंबई | राष्ट्रवादी (NCP) पक्षात मोठी फुट पडल्यानंतर राजकारणात दिवसेंदिवस वेगवेगळ्या मुद्याला धरुन वाद होताना दिसतात. राष्ट्रवादी पक्ष व चिन्ह कोणाचं यावरुन कोर्टात सुनावणी चालू आहे. या सुनावणी दरम्यान अजित पवार (Ajit Pawar) गटाने आपल्याकडे 42 आमदार असल्याचा दावा केला आहे.
अजित पवार गटातील ते 42 वे आमदार कोण?
राष्ट्रवादीच्या ऐकून 53 आमदारांपैकी 42 आमदार आमच्या पाठीशी असल्याचा दावा अजित पवार गटाने केला. त्यामध्ये 42 वे आमदार हे शरद पवार (Sharad Pawar) गटाचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर नवाब मलिक कोणाला पाठिंबा देणार याबाबत तर्कवितर्क लावले जात होते.
नवाब मलिक यांनी अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला असल्याचं म्हटलं जात आहे. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर मलिक यांनी काही दिवसांनी निर्णय जाहीर करणार असल्याचं म्हटलं होतं. मात्र नुकत्याच पार पडलेल्या सुनावणी नंतर अजित पवार गटानी केलेल्या दाव्यामुळे अनेक जणांच्या भुवया उंचवाल्या आहेत.
नवाब मलिक यांनीही त्यांना पाठिंबा दिल्यास एकूण 42 आमदार त्यांच्या बाजूने होणार आहेत. त्यामुळे शरद पवार गटासाठी हा एक मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे.
थोडक्यात बातम्या-
शेतकऱ्यांनी अजित पवारांचा ताफा अडवला आणि…
“भाषणावर आमदार निवडून येत असते तर आज…”
शरद पवार गटाच्या वकिलांचा अत्यंत धक्कादायक दावा!