मध्यरात्री 2 वाजता मनोज जरांगे पाटील यांनी घेतली सभा!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

बीड | मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी तब्बल 17 दिवस मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी जालना जिल्हयातील अंतरवाली सराटी गावात उपोषण केलं होतं. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आरक्षणाबाबत आश्वासन दिल्यानंतर जरांगे पाटलांनी उपोषण मागे घेतलं.

जरांगे पाटील यांची गेल्या काही दिवसांपासून संवाद यात्रा चालू आहे. बीड जिल्ह्यात जरांगे पाटलांची सभा आयोजित करण्यात आली होती. तेव्हा त्यांना कार्यक्रमात पोहोचायला बराच उशीर झाला. मात्र असं असताना मराठा बांधव यांनी त्यांच्या येण्याची वाट पहिली आणि मध्यरात्री 2 वाजता मोठ्या उत्साहात जरांगे पाटील यांचं स्वागत केलं.

बीडमध्ये मनोज जरांगे पाटलांकडून सरकारवर टीका

जरांगे पाटील यांनी मध्यरात्री 2 वाजता बीडकरांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले की, “मराठा समाजामध्ये फूट पाडण्यासाठी सरकार शेवटचा डाव खेळू शकतं. आपल्यामध्ये दुसरा गट तयार करण्याचे प्रयत्न सरकारकडून केले जातील. मात्र अशा कुठल्याही गोष्टीला आपण बळी न पडता आता आरक्षण मिळेपर्यंत एकत्र लढायचं आहे.

संवाद साधत असताना त्यांनी ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्यावर सुद्धा निशाणा साधला. मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळालं पाहिजे. मात्र काही नेते समाजाची दिशाभूल करत आहेत. तर दुसरीकडे मी मुद्दामून छगन भुजबळ यांच्यावर टीका करत नाही, असं त्यांनी सांगितलं.

थोडक्यात बातम्या-

“संजय राऊत ही राज्याला लागलेली कीड”

अजित पवारांच्या बॅनरवर यशवंतराव चव्हाणांचा फोटो; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

मोठी बातमी! शरद पवार गटातील हा आमदार अजित पवारांना पाठिंबा देणार?

शेतकऱ्यांनी अजित पवारांचा ताफा अडवला आणि…

“भाषणावर आमदार निवडून येत असते तर आज…”