मोठी बातमी: अजित पवारांनी दिला ‘या’ पदाचा राजीनामा

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

पुणे | राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) सध्या चांगलेच चर्चेत असतात. मध्यंतरी अजित पवार नाराज असल्याच्या चांगल्याच चर्चा रंगल्या होत्या. पुण्याच्या पालकमंत्रीपदावरुन अजित पवार नाराज असल्याच्या चर्चा होत्या. अनेकांनी तर अजित पवार भाजपसोबत (BJP) काडीमोड करतील अशी शक्यता देखील व्यक्त केली होती.

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shnide) यांच्या दिल्लीवाऱ्या चालू होत्या, त्यामुळे या मुद्द्याला चांगलीच हवा मिळाली होती. अजित पवार खरंच नाराज आहेत का?, असा प्रश्न मीडिया सुद्धा विचारु लागली होती. अशातच नव्या पालकमंत्र्यांची घोषणा करण्यात आली.

नव्या पालकमंत्र्यांच्या यादी अजित पवार यांना पुण्याचे पालकमंत्री (Pune) करण्यात आलं होतं. याशिवाय अन्य काही जिल्ह्यांनाही नवे पालकमंत्री नियुक्त करण्यात आले होते. अजित पवार यांच्या अर्थ खात्यासोबतच पुण्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी सुद्धा आली. याच पालकमंत्रीपदासाठी अजित पवार आग्रही असल्याची माहिती होती.

अजित पवार यांनी नेमका कुठला राजीनामा दिला?

अजित पवार राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. त्यांच्याकडे अर्थमंत्रिपद हे महत्त्वाचं पद आहे. त्यातच आता पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री झाल्याने अजित पवार यांच्यावरील कामाचा भार वाढला आहे. याशिवाय अजित पवार अनेक संस्था संघटनांच्या संचालक मंडळावर सुद्धा आहेत. पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक (PDCC Bank) ही त्यापैकीच एक…

पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक ही पुण्यातील महत्त्वाची बँक आहे. या बँकेचे अजित पवार अध्यक्षही होते. याच बँकेच्या संचालकपदाचा अजित पवार यांनी राजीनामा दिला आहे.

का दिला अजित पवार यांनी राजीनामा?

उपमुख्यमंत्री अजित पवार हे गेल्या ३२ वर्षांपासून पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेवर संचालक आहेत. मधल्या काळात ते बँकेचे अध्यक्ष सुद्धा राहिले आहेत. मात्र गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीत (NCP) फूट पडली आहे. काका शरद पवार (Sharad Pawar) यांच्याशी टक्कर घेऊन अजित पवार भाजपला जाऊन मिळाले. त्यांच्यावर उपमुख्यमंत्रिपदासोबत अर्थखात्यासारखी महत्त्वाची जबाबदारी आहे. नुकतंच पुणे जिल्ह्याचं पालकमंत्रिपद सुद्धा त्यांना मिळालं.

एकूणच अजित पवार यांच्या कामाचा व्याप वाढला आहे, त्यामुळे त्यांना सगळीकडे लक्ष देणं शक्य होत नाही. त्यामुळे त्यांनी पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालकपदाचा राजीनामा दिला असण्याची शक्यता आहे.

बँकेचे अध्यक्ष दिंगबर दुर्गाडे यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे, त्यांनी यासंदर्भात पत्रक सुद्धा काढलं आहे. बँक राज्यात नंबर वनला आणण्याचं काम अजित पवार यांनी केलं. दरम्यान, अजित पवार यांनी संचालकपदाचा राजीनामा दिला असला तरी बँकेच्या कामात त्यांचं लक्ष राहील, तसेच आम्ही त्यांचं मार्गदर्शन घेत राहू, असं दिगंबर दुर्गाडे यांनी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

टोलवरुन ‘हे’ बडे नेते अडचणीत!, राज ठाकरेंनी थेट लावले व्हिडीओ

अखेर प्रतीक्षा संपली!, सीमा हैदरनं दिली गोड बातमी…

निवडणूक आयोगाची मोठी घोषणा, ‘या’ निवडणुकीच्या तारखा जाहीर

छगन भुजबळ यांची थेट शरद पवार यांच्याशी तुलना!

‘जे विठ्ठल बोलत होते ते…’ पत्रकार परिषदेत जितेंद्र आव्हाड अक्षरश: ढसाढसा रडले