अखेर प्रतीक्षा संपली!, सीमा हैदरनं दिली गोड बातमी…

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

दिल्ली | पाकिस्तानची सीमा हैदर (Seema Haider) आणि भारताचा सचिन मीना (Sachin Meena) यांच्या प्रेमकहाणीची चर्चा सोशल मीडियावर चांगलीच रंगली आहे. प्रेमासाठी भारतात पळून आल्यापासून सीमा हैदर कोणत्या ना कोणत्या कारणामुळे कायम चर्चेत असते. दरम्यान आता सीमा आणि सचिन यांच्या प्रेमकहाणीवर एक चित्रपट येणार असल्याच्या चर्चा चांगल्याच रंगल्या आहेत.

सीमा आणि सचिनचा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सीमा हैदर आणि सचिन यांच्या प्रेमकहाणीवर (Lovestory) आधारित असलेल्या या चित्रपटाचं नाव ‘कराची टू नोएडा’ (Karachi To Noida) असं आहे. या सिनेमाचं शूटिंग येत्या 10 आणि 11 ऑक्टोबरला सुरु होणार असून या चित्रपटाची शूटिंग दिल्लीतच होणार आहे, त्यामुळे सीमा आता मनोरंजनसृष्टीत पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे.

“कराची टू नोएडा” या चित्रपटात “गदर 2” या चित्रपटातील अभिनेता रोहित पवार हा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. रोहितने “गदर 2” या चित्रपटात मेजर मलिकची भूमिका साकारली होती, तर दुसरीकडे बाॅलिवूडचा दबंग म्हणून ओळखला जाणाऱ्या सलमान खानच्या (Actor Salman Khan) ‘बजरंगी भाईजान’ या चित्रपटात पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणारा अभिनेता अहसान खान या चित्रपटात आर्मी ऑफिसरच्या भूमिकेत दिसणार आहे. 

सीमा आणि सचिनच्या या चित्रपटाची सगळ्यांना उत्सुकता लागली आहे. प्रोडक्शन टीमने आपल्या अधिकृत X आकाऊॅंटवर ऑडिशनचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.

थोडक्यात बातम्या-

निवडणूक आयोगाची मोठी घोषणा, ‘या’ निवडणुकीच्या तारखा जाहीर

छगन भुजबळ यांची थेट शरद पवार यांच्याशी तुलना!

‘जे विठ्ठल बोलत होते ते…’ पत्रकार परिषदेत जितेंद्र आव्हाड अक्षरश: ढसाढसा रडले

मध्यरात्री 2 वाजता मनोज जरांगे पाटील यांनी घेतली सभा!

“संजय राऊत ही राज्याला लागलेली कीड”