महाराष्ट्रात खळबळ… मोठ्या मॅटरमध्ये शिंदेंच्या खास मंत्र्याचं नाव!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | शेकडो कोटी रुपयांच्या ड्रग्ज प्रकरणातील मुख्य आरोपी ललित पाटील हा ससून रुग्णालयातून पळून गेल्याने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती. पोलिसांसोबतच एकूण यंत्रणेकडे संशयानं पाहिलं जाऊ लागलं आहे. ललित पाटीलचा शोध पोलिसांकडून सुरु आहे. पोलिसांनी हा विषय वाढल्यावर ललित पाटीलच्या भावाला अटक केली आहे. या प्रकरणी राज्याच्या राजकारणात मात्र आता नवा गौप्यस्फोट झाला आहे. या गौप्यस्फोटामुळे या प्रकरणात आता शिंदेंच्या खास मंत्र्यांचं नाव घेतलं गेलं आहे.

शिवसेना- उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी थेट मंत्री दादा भुसे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. ललित पाटील याला ससून रुग्णालयात दाखल करण्यासाठी शिवसेना नेते दादा भुसे यांनीच रुग्णालय प्रशासनाला फोन केला होता, असा धक्कादायक आरोप सुषमा अंधारे यांनी केला आहे. सुषमा अंधारे यांच्या या आरोपांमुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. शिंदेंच्या मंत्र्याचा या प्रकरणात खरंच हात आहे का?, असा प्रश्न आता विचारला जाऊ लागला आहे.

सुषमा अंधारेंनी फक्त एवढाच आरोप केला नाही तर पुढे त्यांनी अत्यंत गंभीर असे आरोप सुद्धा केले आहेत. “दादा भुसे यांच्या फोनचे कॉल रेकॉर्ड चेक करा. ते चेक केल्यावर खरी माहिती समोर येईल, असा दावा सुषमा अंधारे यांनी केला आहे. “ससून रुग्णालय प्रशासनाने ललित पाटीलला उपचारासाठी दाखल करुन घेण्यास नकार दिला होता”, असं सुषमा अंधारे म्हणाल्या आहेत.

दुसरीकडे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेत बोलताना नाना पटोले यांनी स्पष्टपणे नमूद केलं की, एका आमदाराचा या प्रकरणात हात आहे. त्यानंतर काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी सांगितलं की, शिंदे गटाच्या आमदाराचा यात हात आहे. याबाबतची माहिती सर्वांकडे आहे. नाही असं नाही”, असं सुषमा अंधारे म्हणाल्या.

नेमका मॅटर आहे काय?, सुषमा अंधारे काय म्हणाल्या?

“मी आता थेट माहिती घेते. मी नाव घेताना असं सांगतेय की, या सगळ्यात दादा भुसे यांच्या नावाच्या भोवती संशयाचं धूकं असेल तर त्यांचे कॉल रेकॉर्ड का चेक केलं जात नाहीत? दादा भुसेंना प्रश्न का विचारले जाऊ नयेत? गृह खात्याची या प्रकरणाचा खरंच छडा लावण्याची इच्छाशक्ती असेल तर त्यांनी हा विषय स्पष्ट करायला हवा”, असं सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे. संपूर्ण प्रकरण पेटल्यावर आता दादा भुसे यांनी याप्रकरणी स्पष्टीकरण दिलं आहे.

दादा भुसेंनी नेमकं काय स्पष्टीकरण दिलं?

सुषमा अंधारे यांनी दादा भुसे यांचं थेट नाव घेतल्यानंतर दादा भुसे यांनी एका वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया दिली आहेत. त्यात दादा भुसे म्हणतात की “नाना पटोले मला ओळखतात. त्यांनी माझं थेट नाव घेतलं नाही. सुषमा अंधारे यांनी मात्र माझं नाव घेऊन थेट आरोप केला आहे, त्यामुळे या प्रकरणी जगभरातील कोणत्याही यंत्रणेकडून चौकशी करायची असेल तर करा. आंतरराष्ट्रीय पातळीवर कुठलीही चौकशी लावा. मी त्या चौकशीला सामोरं जायला तयार आहे. माझ्यावर चुकीचे आरोप केले आहेत”, असं स्पष्टीकरण दादा भुसे यांनी दिलं आहे, तसंच सुषमा अंधारे यांना थेट आव्हान सुद्धा दिलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

राज्य सरकारची सर्वात मोठी घोषणा: आता मुली होणार लखपती!

मोठी बातमी: अजित पवारांनी दिला ‘या’ पदाचा राजीनामा