‘आधी आपली पिलावळ सांभाळा’, गुणरत्न सदावर्तेंचा राज ठाकरेंना इशारा

मुंबई | महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून टोलनाक्यावरून राजकारण चांगलंच तापलं आहे. मनसेच्या काही नेत्यांनी मुलुंड येथे आंदोलन केलं होतं. त्यानंतर मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यानंतर राज ठाकरे यांनी स्वत: टोलनाके जाळण्याचा इशारा दिला आणि तसा प्रयत्न मुंबईच्या मुलुंडमध्ये घडला.

या सगळ्या प्रकारानंतर आता गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarate) यांनी थेट राज ठाकरे यांच्या विरोधात जाऊन पोलीस तक्रार केली आहे. राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करा, तसेच त्यांना अटक करण्याची मागणी सदावर्ते यांनी केली आहे. त्यामुळे हा वाद आणखी चिघळला असून मनसैनिक पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत.

त्यानंतर सदावर्तेंना धमकीचे फोन येऊ लागले. त्यावर भाष्य करत सदावर्ते यांनी राज ठाकरे यांची पिलावळ मला फोन करून धमकी देत असल्याचं म्हटलं. मला महाराष्ट्रात फिरु देणार नाहीत, अशी देखील धमकी देण्यात आली आहे असं सदावर्ते यांनी सांगितलंय. मनसे कार्यकर्त्यांनी सदावर्ते यांच्यावर जोरदार हल्लाबोल करत प्रत्युत्तर देत सडकून टीकाही केली.

थोडक्यात बातम्या-

ललित पाटीलचं नाशिक कनेक्शन, अत्यंत धक्कादायक माहिती समोर

अजित पवारांचे चिरंजीव पार्थ पवारांवर मोठी जबाबदारी?

“100 दिवस महाराष्ट्राचा स्वाभिमान दिल्लीपुढे गहाण ठेवला”

16 आमदारांच्या अपात्रतेबाबत मोठी अपडेट समोर!

महाराष्ट्रात खळबळ… मोठ्या मॅटरमध्ये शिंदेंच्या खास मंत्र्याचं नाव!