“शरद पवारांनी दिलेला शब्द पाळण्यासाठी अजितदादा भाजपसोबत गेले”

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | 2019 ला झालेल्या पहाटेच्या शपथविधीबद्दल राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी सविस्तरपणे सांगितलं आहे. शरद पवार (Sharad Pawar) यांनी भाजपला सोबत येण्याचा शब्द दिला. मात्र ते भाजपसोबत गेले नाहीत. पण शब्द खरा करण्यासाठी, दिलेला शब्द पाळण्यासाठी अजित पवार भाजपसोबत गेले आणि पहाटेचा शपथविधी घेतला, असा गौप्यस्फोट छगन भुजबळ (Chagan Bhujbal) यांनी केलाय. ते टीव्ही 9 मराठीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.

अजित पवार यांनी कोणतंही बंड केलं नाही. शरद पवार आणि अजित पवार दोघांनीही भाजपला शब्द दिला होता. नंतर पवार यांनी माघार घेतली. त्यामुळे अजितदादांनी पहाटेची शपथ घेतली. केवळ दिलेला शब्द पाळण्यासाठीच अजितदादा भाजपसोबत गेले, असं भुजबळांनी सांगितलं.

शरद पवार यांनी राजीनामा दिला. तेव्हा सुप्रिया सुळे यांना अध्यक्ष करण्याचं ठरलं होतं. सुप्रिया सुळे या अध्यक्ष होतील मग राष्ट्रवादी भाजपसोबत जाईल, असं ठरलं होतं, असंही त्यांनी सांगितलं.

15 दिवस पवारांच्या घरात चर्चा झाली असावी. अजितदादांना ते माहिती होतं. सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वात भाजपसोबत जायचं ठरलं होतं. म्हणूच शरद पवार यांनी राजीनामा दिला, असं छगन भुजबळ म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या-