“मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रीपद कंत्राटी करून टाका, ते तरी कायमचं कशाला?”

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | मुंबईत कंत्राटी पद्धतीने पोलीस भरती करण्याचा निर्णय घेतला होता. यावरून विरोधकांनी सरकारवर टीकास्त्र सोडलं होतं. आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी देखील सरकारवर टीका केली आहे. आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देखील कंत्राटी करा, असा टोला राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी सरकारला लगावला आहे.

एकीकडे बेरोजगारांची संख्या वाढत आहे आणि दुसरीकडे कंत्राटी भरती करत आहे. तर मग मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री तरी कशाला ठेवता?, ते देखील कंत्राटी करून टाका. तसेच दुसऱ्या पक्षातील उसने घेतलेले लोक आहेतच, असं राजू शेट्टी (Raju Shetti) म्हणालेत.

जनता तुम्हाला कर का द्यावा? लोकांच्या मुलभूत गरजांमध्ये अन्न वस्त्र निवारा आरोग्य आणि शिक्षण या गोष्टी येतात. या गरजा तळगाळातल्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवणं ही सरकारची जबाबदारी आहे. यासाठीच सामान्य माणूस प्रामाणिकपणे कर भरतो. पण सरकारच सगळ्या गोष्टींमधून अंग काढून घेत असेल तर जनतेने तुम्हाला कर का द्यायचा?, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

दरम्यान, सरकारच्या अशा धोऱणांमुळे सामान्य लोकांचं नुकसान होत आहे. याकडे लक्ष दिल गेलं पाहिजे, असं म्हणत राजू शेट्टींनी सरकरावर निशाणा साधला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-