ड्रीम 11 मध्ये दीड कोटी जिंकलेला पीएसआय अडचणीत, आता…

पुणे | ड्रीम 11 मधील दीड कोंटीची रक्कम जिंकणारे पिंपरीतील पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ झेंडे अडचणीत आले आहेत. त्यांची आता चौकशी होणार आहे. एकीकडे करोडपती झाल्याचा आनंद तर दुसरीकडे चौकशीची टांगती तलवार झेंडे यांच्यावर आहे.

पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ झेंडेंची आता पोलीस उपायुक्तांकडून चौकशी होणार आहे. प्रशासकीय तसेच कायदेशीर बाबी तपासून त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असं पिंपरी चिंचवड पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. या चौकशीत त्यांच्यावर काही कारवाई होते की हा केवळ कारवाईचा फास ठरतो, हे लवकरच कळणार आहे.

सोमनाथ यांनी गेल्या दोन तीन महिन्यांपासून ड्रीम 11 खेळण्यास सुरूवात केली होती. झेंडे यांनी निवडलेल्या टीमला रँकिंग मिळालं आणि तब्बल दीड कोटी रुपयांचं बक्षीस सोमनाथ यांना मिळालं आहे. या रकमेतील टीडीएस वजा करून जिंकलेली रक्कम त्यांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात झाली आहे.

दरम्यान, झेंडे यांना मिळालेल्या या यशामुळे कुटुंबात जल्लोष करण्यात आला. नीट अभ्यास करून खेळल्यामुळेच यश मिळालं आहे. त्यांच्या या कामगिरीबद्दल मित्रमंडळीकडून आणि नातेवाईकांकडून त्यांचं कौतुक केलं जात आहे. मात्र आता चौकशी होणार असल्याने त्यांच्या अडचणीत वाढ झाल्याचं दिसतंय.

महत्त्वाच्या बातम्या-