जरांगे पाटलांनी सरकारकडे केल्या ‘या’ 6 मागण्या

जालना | मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांची भव्य दिव्य सभा आज अंतरवाली सराटी (Antarwali) गावात पार पडली. यावेळी बोलत असताना जरांगे पाटलांनी शिंदे फडणवीस (Shinde -Fadnavis-Pawar) आणि पवार सरकारवर हल्लाबोल केला.

मराठा आरक्षणाविषयी आक्रमक झालेले जरांगे पाटील यांनी सरकारला थेट इशारा दिला. जर येत्या 10 दिवसात आरक्षण नाही मिळालं तर मी खूप टोकाचं पाऊल उचलेल, असं जरांगे पाटील म्हणालेत. येत्या 23 ओक्टोबरपर्यंत जर आरक्षण नाही मिळालं तर माझी अंत्ययात्रा निघेल किंवा मग मराठा समाजाची विजयी यात्रा, असंही ते म्हणालेत. यावेळी बोलताना जरांगे पाटलांनी सरकारकडे सहा मागण्या केल्या आहेत.

कोणत्या आहेत 6 मागण्या?

मराठा समाजाला सरसकट कुणबी असल्याचं प्रमाणपत्र देऊन मराठ्यांचा ओबीसीत समावेश करा.

कोपर्डीतील तरुणीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला फाशीची शिक्षा द्या

मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या 45 बांधवांना निधी आणि सरकारी नोकरी द्या

दर 10 वर्षाला आरक्षण दिलेल्या ओबीसींचा सर्व्हे करा. सर्व्हे करून प्रगत जाती आरक्षणातून बाहेर काढा

सारथी मार्फत पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांना जास्तीचा निधी द्या. त्यांचे प्रश्न तातडीने मार्गी लावा

महाराष्ट्रातील मराठा समाजाला 50 टक्क्याच्या आत मराठा म्हणून वेगळा प्रवर्ग करून आरक्षण दिलं तरी चालेल. पण एनटी, व्हिजेएनटीचा प्रवर्ग टिकला तरच आरक्षण घेणार. नाहीतर 50 टक्क्यांच्यावर घेणार नाही.

सर्व्हे करून ओबीसींच्या ज्या प्रगत जाती आहेत, त्यांना आरक्षणातून वगळण्यात यावं, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. त्यामुळे या मागणीवरून नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

थो़डक्यात बातम्या-

Join WhatsApp

Join Now

संबंधित बातम्या

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .