जरांगे पाटलांना छगन भुजबळांचं प्रत्युत्तर, म्हणाले…

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

जालना | जालन्यातील अंतरवली सराटी गावात मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांची सभा झाली. भाषणातून मनोज जरांगे पाटील यांनी राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधला. याला आता छगन भुजबळ यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

मी अजितदादा पवार (Ajit Pawar) यांना आवाहन करतो की, छगन भुजबळांना जरा समज द्या. नाहीतर ते माझ्या नादी लागले तर काही खरं नाही. मग मी सोडत नाही, असं मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी म्हटलं. त्यांच्या या टीकेला आता छगन भुजबळ यांनी उत्तर दिलं आहे. तसेच त्यांना धमकीचे फोन येत असल्याचं सांगितलं.

मला धमकीचे फोन आणि मेसेज येत आहेत. एकदा नाही. तर अनेकवेळा धमकीचे फोन आणि मेसेज येत आहेत. तू जिवंत राहणार नाही. तुझी वाट लावू अशी धमकी देते आहेत. शिव्याही दिल्या जात आहेत, असं भुजबळांनी सांगितलंय.

राज्यात ओबीसी 54 टक्के पेक्षा जास्त आहेत. मराठा समाजाला वेगळं आणि टिकणारं आरक्षण द्या. मनोज जरांगे पाटील यांचं मी काय खाललं आहे हे त्यांनी सांगावं. आता मनोज जरांगे पाटील कुणाचं खातोय हे त्यांनी सांगावं, असं छगन भुजबळ म्हणालेत.

मी एका जातीचं प्रतिनिधित्व करत नाही. तर मी ओबीसी समाजाचं प्रतिनिधित्व करतो. ओबीसी समाजासाठी काम करतो. महादेव जानकर यांनी मला समर्थन दिलं आहे. मी त्यांचा आभारी आहे. सध्या तरी ओबीसी बचाव हे एकच आमचं काम आहे, असंही भुजबळ म्हणालेत.

महत्त्वाच्या बातम्या-