‘जरांगे पाटलांना संविधानाचं ज्ञान नाही’; सदावर्तेंची जरांगे पाटलांवर टीका

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | जालना येथे पार पाडलेल्या मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या सभेला आज लाखो मराठा समाजाने हाजेरी लावली. यावेळी मनोज जरांगे पाटलांनी सरकारकडे काही महत्त्वाच्या मागण्या केल्या. शिवाय त्यांनी राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्यावर हल्लबोल केला.

मनोज जरांगे पाटील यांच्यावर अॅड. गुणरत्न सदावर्ते (Adv. Gunaratna Sadavarte) यांनी जोरदार टीका केली. सदावर्ते म्हणाले, की आज सुद्धा जरांगे स्वत:ला पाटील म्हणतात. पाटीलकी कोणाकडे असते. उच्च वर्गासाठी पाटीलकी असते. आरक्षण उच्च वर्गासाठी नसतं. जरांगेंचे राजकीय बॉस वेगळेच आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) त्यांच्या पाठिशी आहेत.

जरांगे पाटील यांना काही ज्ञान नाही. संविधानाचं देखील काही ज्ञान नाही. काही आकलन नाही. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिलेल्या आरक्षणाचा आम्हाला आदर आहे, असं गुणरत्न सदावर्ते म्हणाले. आज घेतलेल्या सभेत मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला सुद्धा चांगलंच घेरलं. आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार घेणार नाही, असं जरांगे पाटील म्हणाले.

थोडक्यात बातम्या-

जरांगे पाटलांना छगन भुजबळांचं प्रत्युत्तर, म्हणाले…

जरांगे पाटलांनी सरकारकडे केल्या ‘या’ 6 मागण्या

‘एकतर माझी अंत्ययात्रा निघेल नाही तर…’; मनोज जरांगे पाटील आक्रमक

 “भुजबळांना समज द्या… माझ्या नादी लागले तर काही खरं नाही”

‘माझी निवडणुकीची खाज आता भागली’; उदयनराजेंचं सूचक वक्तव्