नागपूर | केंद्रीय मंत्री आणि रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले (Ramdas Athavle) यांनी शरद पवार (Sharad Pawar) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांच्या वादावर एक उपाय सूचवला आहे. रामदास आठवले हे नागपुरात (Nagpur) आले होते. यावेळी बोलताना त्यांनी शरद पवार आणि अजित पवार यांच्यातील वादावर भाष्य केलं.
शरद पवार यांनी एनडीएमध्ये यावं. मग अजितदादा गट शरद पवार (Sharad Pawar) यांना राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून मान्यता देईल. त्यामुळे वादच मिटेल, असं रामदास आठवले म्हणालेत.
शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात चांगले संबंध आहेत. शिवाय शरद पवार यांनी 2014 मध्ये भाजप सरकारला पाठिंबा दिलाच होता. त्यामुळे पवारांनी एनडीएमध्ये यायला हरकत नाही, असं रामदास आठवले म्हणाले.
दरम्यान, भाजप छोट्या पक्षांना संपवत नाही. उलट छोट्या पक्षांना बळ देऊन वाढवण्याचं काम भाजप करत आहे. उद्धव ठाकरे यांचा पक्ष त्यांच्यामुळेच संपला. उद्धव ठाकरे यांनी भाजपवर केलेल्या आरोपात काहीच तथ्य नाही, असंही आठवले यांनी स्पष्ट केलं.
महत्त्वाच्या बातम्या-