मीरा बोरवणकर यांचा खळबळजनक आरोप!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

पुणे | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) अडचणीत आले आहे. पुणे येथील माजी पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर (Meera Borvankar) यांच्या पुस्तकामुळे अजित पवार यांच्या अडचणी वाढल्या आहेत. 2010 मधील या प्रकरणाचा उल्लेख त्यांनी त्यांच्या ‘मॅडम कमिशनर’ या पुस्तकातून केला आहे.

येरवडा येथील तीन एकर जमीन पालकमंत्र्यांनी एका खासगी बिल्डरला दिली. पुस्तकात त्यांनी थेट अजित पवार यांचं नाव घेतलेलं नाही. परंतु जिल्ह्याचे मंत्री ‘दादा’ असं म्हटलं आहे. दरम्यान अजित पवार (Ajit Pawar) यांनी हे सर्व आरोप फेटाळले आहेत.

मीरा बोरवणकर यांच्या आरोपाला तत्कालीन विभागीय आयुक्त दिलीप बंड यांनी उत्तर दिलं आहे. मी माजी विभागीय आयुक्त असताना येरवडा येथील जमिनीचा प्रस्ताव शासनाला दिला होता. एका बिल्डकरडून प्रस्ताव आला होता. त्यांच्याकडे आधीच येरवडा पोलीस स्टेशनच्या आसपासची जमीन होती. त्या जमिनीमध्ये पोलीस विभागाची जमीन येत होती. त्यामुळे त्याला ती जमीन हवी होती, असं बंड यांनी सांगितलं आहे.

ती जमीन पोलीस विभागाची असल्यामुळे तक्तालीन गृहमंत्री आर आर पाटील यांनी याला मान्यता दिली होती. तेव्हा मीरा बोरवणकर आयुक्त म्हणून रुजू झाल्या होत्या. त्यांनी हा प्रस्ताव मान्य केला असता तर पोलिसांना घरे मिळाली असती. पालकमंत्री म्हणून अजित पवार यांनी ही बैठक घेतली असली तरी त्या जागेचा आणि अजित पवार यांचा काही संबंध नाही, असं त्यांनी सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या-